आपुलकी कर्करोग रुग्णालयाचा प्रकल्प भविष्यासाठी मैलाचा दगड ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

Devendra Fadanvis-आपुलकी मेडिकल सेंटर मॉडेलच्या आधारावर भविष्यात असे अनेक रुग्णालये तयार करता येतील.

  • Written By: Published:
PMC Devendra Fadanvis

पुणे: कर्करोगाच्या विरोधात लढा देण्यासाठी आपण विविध पातळीवर प्रयत्न करत आहोत. पुणे महानगरपालिका (PMC) आणि आपुलकी मेडिकल सेंटरच्या (Apulki Medical Center)च्या वतीने उभारण्यात आलेले हे केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. या मॉडेलच्या आधारावर भविष्यात असे अनेक रुग्णालये तयार करता येतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी व्यक्त केले.

आपुलकी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) तत्त्वावरील कॅन्सर व कार्डियाक संबंधीत अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असलेल्या बाणेरस्थित आपुलकी मेडिकल सेंटरचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपुलकी मेडिकल सेंटर मॉडेलच्या आधारावर भविष्यात असे अनेक रुग्णालये तयार करता येतील. मागील काही वर्षांत कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यासाठीच्या उपचाराचा खर्चही मोठा असतो. या परिस्थितीत पीपीपी तत्वावर उभारण्यात आलेले हे रुग्णालयात मोठा दिलासा देणारे ठरणार आहे. सीजीएसएचच्या माध्यमातून उपचार करण्याची तयारी दाखवली याबाबद्दल आपुलकी हेल्थ केअरचे आभार आहेत.

राष्ट्रवादीतील नाराजीच्या चर्चांदरम्यान पार्थ पवारांची फडणवीसांना भेट; आनंद परांजपे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तारकीर, पुणे महानगपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बिडकर, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते निलेश निकम, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, नगरसेवक उपस्थित होते. त्याआधी कोनशिला अनावरणानंतर मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांनी आपुलकी मेडिकल सेंटर अत्याधुनिक सुविधांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. आपुलकी मेडिकल सेंटरचे चेअरमन डॉ. प्रितेश मुनोत व व्यवस्थापकीय संचालक पियुष राका यांनी मान्यवरांना मेडिकल सेंटरवर उपलब्ध आधुनिक सुविधांची माहिती दिली.


शांतता करार नाही तर इराणला वाईट काळाचा सामना करावा लागेल, ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ

पुणे महानगरपालिकेसोबत अशा पथदर्शी प्रकल्पाची उभारणीत केलेल्या कामगिरीसाठी यावेळी महापालिका सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे व आपुलकी हेल्थकेअर लिमिटेडचे सुनील नहार, सचिन नहार व रवी जैन यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.


बाणेर येथे 150 खाटांचे कर्करोग आणि ह्दयरोग रुग्णालय

पुण्यासह राज्यातील नागरिकांना अत्याधुनिक-परवडणारी व जागतिक दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाणेर स्थित हे अत्याधुनिक 150 खाटांचे कर्करोग आणि हृदयरोग रुग्णालय प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या रूग्णालयातील सर्व क्लिनिकल सेवा सीजीएचएस (शासकीय दरानुसार) दरांवर दिल्या जाणार आहे. ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रमुख आरोग्य सेवा योजनांची उपलब्धता असणार आहे. ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी समावेशकता आणि प्रवेश योग्यता सुनिश्चित होणार आहे..


आपुलकी मेडिकल सेंटरमध्ये कोणत्या सुविधा मिळणार ?

आपुलकी मेडिकल सेंटरची रचना अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली आहे. लिनियर अ‍ॅक्सिलरेटर – ट्रूबीम, हायपरआर्क (भारतातील कोणत्याही पीपीपी प्रकल्पात अशा प्रकारची प्रथमच ही सेवा उपलब्ध करून दिली जाते आहे.) डिजिटल पेट स्कॅनर, जीनोम सिक्वेन्सिंग सुविधा, संपूर्ण पॅथॉलॉजी आणि हिस्टोपॅथॉलॉजी सेवा, 3 टेस्ला एमआरआय, 160 स्लाइस सीटी स्कॅनर, तीन मॉड्यूलर ऑपरेटिंग थिएटर (2 मेजर + 1 मायनर), समर्पित 20-बेडेड आयसीयू/सीसीयू, आठ-बेडेड न्यूक्लियर मेडिसीन विभाग ( देशातील सर्वात मोठ्या विभागांपैकी एक), 23-बेडेड किमोथेरपी वॉर्डचा व्यापक वापर करण्यात आला आहे. खाजगी, अर्ध-खाजगी आणि सामान्य वॉर्डचा समावेश करण्यात आला आहे. रुग्णांसाठी सर्व शासकीय वैद्यकीय योजना व अनुदान योजनांची उपलब्धता असणार आहे. खासगी विमा कंपन्यांच्या सेवेची उपलब्धता आहे. या उपचार पध्दतीचे दर सी.जी. एच.एस. दरानुसार पुरविण्यात येणार आहे. या उपचार पध्दतीचा गरीब व गरजू रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

follow us