Download App

वजन कमी करणे अवघड आहे? मग या 3 गोष्टी दुधात मिसळून प्या, काही दिवसांत जाणवेल फरक

Milk for weight loss: अति लठ्ठपणा व्यक्तीचे व्यक्तिमत्व तर बिघडवतेच पण शरीरात इतर अनेक आजारांना जन्म देण्याचे कारण बनते. जर तुम्ही खूप दिवसांपासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये अपयशी ठरत असाल तर या 3 गोष्टी दुधात मिसळून प्या.

फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियमसह व्हिटॅमिन A, D आणि B12 देखील दुधामध्ये असतात. हे घटक आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. तुम्ही लोकांना वाढवण्यासाठी केळीसोबत दूध पिताना पाहिलं असेल. पण वजन कमी करण्यासाठी तुम्ही दुधात अनेक गोष्टी घालून ते पिऊ शकता. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

दूध आणि हळद-
वजन कमी करण्यासाठी दूध आणि हळद यांचे मिश्रण खूप प्रभावी मानले जाते. यासाठी एक ग्लास दुधात हळद पावडर मिसळून रोज रात्री झोपताना सेवन करा. हळदीचे दूध पिल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच बॅक्टेरियाच्या संसर्गापासूनही बचाव होतो. वजन कमी करण्यासाठी हा उपाय केल्याने व्यक्तीला अशक्तपणा जाणवत नाही.

तुळजापूरमध्ये उभे राहणार अत्याधुनिक बसस्थानक

दूध आणि बदाम
वजन कमी करण्यासाठी दुधात बदाम मिसळून घेतले तरी देखील फायदेशीर मानले जाते. दररोज सकाळी दुधासोबत बदाम घेतल्याने माणसाला जास्त वेळ भूक लागत नाही आणि अति आहार टाळतो. ज्यामुळे हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते. हा उपाय करण्यासाठी एका ग्लास दुधात बदाम पावडर मिसळून प्या.

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आता देशासाठी थोपटणार दंड!

दूध आणि अंजीर
वजन कमी करण्यासाठी अंजीर दुधात मिसळूनही खाऊ शकता. अंजीरमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे व्यक्तीचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि त्याला बद्धकोष्ठतेची तक्रार नसते. हा उपाय करण्यासाठी एक ते दोन अंजीर एका ग्लासात दुधात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यासोबतच वजन कमी होण्यास मदत होते.

Tags

follow us