तुळजापूरमध्ये उभे राहणार नवे बसस्थानक
Mla Ranajagjitsinha Patil : तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक सर्व आधुनित सोयीसुविधांचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. यासाठी ३ कोटी ६१ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार वाढीव निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
Opposition Meet: बेंगळुरूमधून 26 पक्षांचा ‘सामूहिक संकल्प’, भाजपवर हल्लाबोल
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला देशभरातून वर्षभर लाखो भाविक येतात. या भाविकांना व पर्यटकांना अगदी आगमनापासूनच आपल्या धार्मिक व ऐतिहासिक वारसा स्थळाविषयी सकारात्मक भावना निर्माण करणारे बसस्थानक उभारण्याची संकल्पना लवकरच साकारण्यात येत आहे. अशा वास्तू अनेक दशकात एकदाच उभारण्यात येत असल्याने विविध संकल्पना मागविण्यात येत आहेत. तुळजापूरच्या वैभवशाली इतिहासाला साजेसे बसस्थानक उभारण्यात येणार आहे.
मुंबईतल्या ‘त्या’ घटनेवर चंद्रकांत पाटलांचं सभागृहात उत्तर, म्हणाले, एकटी…
राज्य परिवहन महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक (बांधकाम) यांच्याबरोबर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची बैठकी झाली. त्यांनी बस स्थानकाला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. या बैठकीमध्ये बसस्थानकाची उभारणी ऐतिहासिक व धार्मिक पध्दतीने करणे, प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह सध्याचे वाहनतळ तात्पुरते दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच तुळजापूर येथील लातूर रोडलगत मराठवाडा कृषी विद्यापीठ व भात संशोधन केंद्राची १० एकर जागा नवीन आगार बांधण्यासाठी मागणी करण्यात येणार आहे.
या बैठकीस राज्य परिवहन महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक विद्या भिलारकर, विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर, विभागीय अभियंता शाशिकांत उबाळे, कनिष्ठ अभियंता राहुल पवार आदी उपस्थित होते.