Download App

Tesla Car : टाटांना आव्हान देण्यासाठी अंबानी आणि मस्क एकत्र येणार! काय आहे प्लॅन?

  • Written By: Last Updated:

Tesla Company India Plant : भारताच्या वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric vehicles) बाजारपेठेत सध्या टाटा मोटर्सचे (Tata Motors) वर्चस्व आहे. मात्र, आता एलॉन मस्कची (Elon Musk) टेस्ला (Tesla) ही इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी देखील भारतात येणार आहे. त्यामुळं आगामी काळात टाटा मोटर्ससाठी स्पर्धा वाढणार आहे.

‘वंचित’च्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट; आंबेडकरांचा काँग्रेसला सज्जड दम 

भारत सरकारने अलीकडेच त्यांचे नवीन EV धोरण जारी केले ज्यामध्ये EV साठी आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव होता. यामुळे टेस्लासारख्या कंपन्यांसाठी भारताची दारे खुली झाली आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलॉन मस्कची कंपनी टेस्ला भारतात ईव्ही बनवण्यासाठी एक संयुक्त उपक्रम तयार करण्याची योजना आखत आहे. यासाठी मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजशी बोलणी सुरू आहेत. अलीकडेच टेस्लाने आपल्या जर्मन प्लांटमध्ये भारतीय बाजारपेठेसाठी मोटारींचे उत्पादन सुरू केल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर आता कंपनी भारतात प्लांट उभारण्यासाठी अनेक राज्यांमध्ये ठिकाणे शोधत आहे.

Ramayana: श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीरनं घेतलं तगडं मानधन, आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क! 

एका अहवालानुसार, टेस्ला आणि रिलायन्स यांच्यात एका महिन्याहून अधिक काळ चर्चा सुरू आहे. हा संवाद अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. एका सूत्राने सांगितले की, रिलायन्सची भूमिका अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु ते टेस्लासाठी उत्पादन सुविधा आणि त्याच्याशी संबंधित इकोसिस्टम तयार करेल.

मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला कार कंपनीला आपल्या भारतातील प्लांटसाठी सुमारे 2 ते 3 अब्ज डॉलर्सचा खर्च येणार आहे. विशेष म्हणजे टेस्ला शिष्टमंडळ एप्रिलच्या अखेरीसच भारतात येऊ शकते. हे शिष्टमंडळ कार निर्मितीसाठी अनुकूल वातावरण आणि सोईसुविधा असलेल्या प्रदेशाचा शोध घेणार आहे. हे शिष्टमंडळ महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू या राज्यांना भेटी देऊन योग्य जागा शोधणार आहे.

टाटा मोटर्स समोर अनेक विदेशी कंपन्यांचे आव्हाने
दरम्यान, 2023 मध्ये भारताच्या एकूण कार विक्रीमध्ये EV चा वाटा केवळ दोन टक्के होता, जो 2030 पर्यंत 30 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. सध्या टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्सचे भारतीय ईव्ही मार्केटवर वर्चस्व आहे. जानेवारीमध्ये व्हिएतनामी कंपनी VinFast ने भारतीय बाजारात दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. कंपनीने तामिळनाडूमध्ये ईव्ही कारखाना बांधण्याचे काम सुरू केले आहे. याचा अर्थ आगामी काळात टाटा मोटर्सला अनेक देशी-विदेशी कंपन्यांकडून खडतर स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. चीनची सर्वात मोठी ईव्ही कंपनी BYD ने भारतातही आपली वाहने लाँच केली आहेत.

 

follow us

वेब स्टोरीज