LetsUpp | Govt.Schemes
विविध व्यवसायांच्या (professions) प्रत्यक्ष प्रशिक्षणाव्दारे उमेदवारांचे कसब व पात्रता वाढवून त्यांना नियमित रोजगार (regular employment)उपलब्ध करुन देणे अथवा प्रशिक्षण (Training)पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे स्वयंरोजगार सुरु करणे (Starting self-employment)शक्य होण्यासाठी ही योजना (Schemes)सुरु करण्यात आली आहे.
योजनेच्या प्रमुख अटी : उमेदवारांनी संचालनालयाच्या वेबपोर्टलवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
सर्वज्ञानी संजय राऊत थोडी तरी लाज बाळगा, हा मुर्खपणा; चित्रा वाघांनी राऊतांना सुनावलं..
आवश्यक कागदपत्रे : नावनोंदणी केलेले कार्ड तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
लाभाचे स्वरूप असे : सदर योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असून यासाठी पाठयवेतनाचे दर उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे दरमहा 300 ते 1000 रुपये प्रमाणे होते.
या ठिकाणी संपर्क साधावा : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय, कोकणभवन, नवी मुंबई
संकेतस्थळ : http://www.maharojgar.gov.in
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)