Download App

ESIC मध्ये नोकरीची संधी, वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू, कधी पर्यंत करता येणार अर्ज?

  • Written By: Last Updated:

ESIC Pune Bharti 2024: वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आता आनंदाची बातमी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांना पुण्यात सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे (Employees State Insurance Corporation) यांनी वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 15 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार या भरतीसाठी ऑफलाइन/ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करू शकतात.

पोपट दे अन् घटस्फोट घे; पतीचा पत्नीत नाहीतर पोपटात जीव, नेमका विषय काय? 

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. ही भरती मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तर मग या मुलाखतीची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

एकूण पदांची संख्या – १५

शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराने MBBS चे शिक्षण घेतलेलं असावं.. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे आणि तपशीलवार माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचा.

नोकरीचे ठिकाण – पुणे

वयोमर्यादा – ६९ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – भरतीसाठी अर्ज ऑनलाइन (ई-मेल)/ऑफलाइन मोडद्वारे केला जाऊ शकतो.

बच्चू कडूंचा मास्टरस्ट्रोक! दादा भुसे आणि झेडपी प्रशासनाला अंधारात ठेवून दिव्यांग भवनाचे उद्घाटन 

ई-मेल पत्ता – establishrpune.amo@gmail.com

अधिकृत वेबसाईट –
https://www.esic.gov.in/

आवश्यक कागदपत्रे:
वयाचा पुरावा म्हणून १० वीची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्या दाखला.
सर्व शैक्षणिक गुणपत्रत
रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र
अनुभव पत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो २

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीची तारीख– 5 जानेवारी 2024

मुलाखतीचा पत्ता –
प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय,
तळमजला, पंचदीप भवन, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे-411037

अधिकृत संकेतस्थळ –
https://www.esic.gov.in/

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/19kroICw6eAH1REOKCOwO7kY2JMLQv95j/view

असा अर्ज करा-
ऑनलाइन (ई-मेल)/ऑफलाइन मोडद्वारे भरतीसाठी अर्ज करा. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज पाठवा. माहिती अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरा. सर्व आवश्यक पात्रता अटींबद्दल संपूर्ण माहिती प्रदान करा. अर्ज करतांना चुकीची माहिती भरू नका. अन्यथाअपूर्ण अर्ज नाकारले जातील. 31 डिसेंबर 2023 पूर्वीच अर्ज करा.

Tags

follow us