बच्चू कडूंचा मास्टरस्ट्रोक! दादा भुसे आणि झेडपी प्रशासनाला अंधारात ठेवून दिव्यांग भवनाचे उद्घाटन

  • Written By: Published:
बच्चू कडूंचा मास्टरस्ट्रोक! दादा भुसे आणि झेडपी प्रशासनाला अंधारात ठेवून दिव्यांग भवनाचे उद्घाटन

Chandvad’s Divyang Bhavan : प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे स्वत: सरकारमध्ये सहभागी आहेत. मात्र, अनेकदा ते सरकारच्या विरोधात जाऊन मोर्चे, आंदोलने करत असतात. त्यामुळं ते सतत चर्चेत असतात. आता तर त्यांनी परस्परच चांदवडच्या दिव्यांग भवनाचे (Chandvad’s Divyang Bhavan) उद्घाटन करून टाकले. प्रशासनाला अंधारात ठेऊन रात्री पावणेबारा वाजता त्यांनी हे उद्घाटन केले. त्यामुळं स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी पसरली.

‘मैं अटल हूं’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पंकज त्रिपाठींनी साकारली वाजपेयींची हुबेहूब व्यक्तिरेखा 

प्राप्त माहितीनुसार, नाशिक जिल्हा परिषदेने 2018 साली सामाजिक कल्याण योजनेंतर्गत दिव्यांग कल्याणासाठीच्या जिल्हा परिषद सेसच्या पाच टक्के निधीतून चांदवडला दिव्यांग भवन बांधण्याचा निर्णय घेतला होता. या दिव्यांग भवनाच्या बांधकामास जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समितीने मान्यता दिली होती. त्यानंतर नाशिकचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या दिव्यांग भवनाच्या बांधकामासाठी 42 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती. याशिवाय या दिव्यांग भवनाच्या माध्यमातून दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देणे, त्यांना रोजगार प्रशिक्षण देणे आदींसाठी 45 लाख रुपयांची अतिरिक्त मान्यता देण्यात आली.

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा नवा लुक, जस्ट लूकिंग लाईक अ वॉव! 

त्यानंतर या दिव्यांग भवनाचे काम जिल्हा परिषदेच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले. त्यानंतर आता आमदार कडू हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या शासकीय दौऱ्यात या उ्दघाटनाचा समावेश नसतानाही त्यांनी या दिव्यांग भवनाचे उद्घाटन केले. त्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पत्रिकाही छापल्या होत्या.एवढचं नाही तर चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रजेवर असल्याने त्यांचा पदभार सांभाळत असलेल्या सहाय्याक गटविकास अधिकाऱ्यावर प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दबाव टाकून कार्यक्रमास हजर राहण्यास भाग पाडले. त्यामुळं कडू यांनी केलेले उद्घाटन चर्चेचा विषय बनले आहे.

शासकीय नियमानुसार, दिव्यांग भवनाचे उद्घाटन पालकमंत्री व स्थानिक आमदारांच्या हस्ते होणं अपेक्षित असतांना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि बच्चू कडूंनी जिल्हा परिषद यंत्रणेला अंधारात ठेवून उद्घाटन केले. प्रहारने छापलेल्या पत्रिकेनुसार, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री दादा भुसे होते. तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या देखील या कार्यक्रमास हजर राहणार होत्या. या कार्यक्रम पत्रिकेत सरकारी प्रोटोकॉलची पायमल्ली करत स्थानिक आमदार डॉ. राहुल आहेर यांना त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते.

मात्र, या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषदेने केले नव्हते. त्यामुळं एकाही लोकप्रतिनिधीला शासकीय यंत्रणेकडून उद्घाटनाचे निमंत्रण गेले नाही. स्थानिक नेत्यांना अनभिज्ञ ठेऊन परस्परच उद्घाटन केल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, चांदवडचे दिव्यांग भवन जिल्हा परिषदेच्या सेसमधून बांधल असून त्याची जबाबदारी चांदवड पंचायत समितीची आहे. मात्र, चांदवडच्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी या दिव्यांग भवन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक यांची परवानगी न घेता पार पाडला. यामुळे संबंधित सहायक गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube