Download App

ESIC मध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 1 लाख रुपये पगार

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने भरतीसाठी एक अधिसूचना काढली आहे. या भरतीअंतर्गत पूर्णवेळ विशेषज्ञ आणि अर्धवेळ विशेषज्ञ ही पदे भरली जाणार

  • Written By: Last Updated:

ESIC Recruitment 2024 : आज अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे, भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने भरतीसाठी एक अधिसूचना काढली आहे. या भरतीअंतर्गत पूर्णवेळ विशेषज्ञ (Full Time Specialist) आणि अर्धवेळ विशेषज्ञ (Part time specialist) ही पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, याच भरतीप्रक्रियेविषयी जाणून घेऊ.

पुरावेच नाही तर माणसंही गायब करण्याची कॉंग्रेसची परंपरा; उदयराजेंची कॉंग्रेसवर सडकून टीका 

या भरतीअंतर्गत पूर्णवेळ विशेषज्ञ आणि अर्धवेळ विशेषज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. फुल टाइम स्पेशालिस्ट (FTS) आणि पार्ट टाइम स्पेशालिस्ट (PTS) भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. च्छुक आणि पात्र उमेदवार esic.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.

इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल 2024 पर्यंत वेळ आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरणे आवश्यक आहे.

Mylek : ‘मायलेक’चा आणखी एक विक्रम, विशेष मुलांसाठी पालकांसाठी सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग 

शैक्षणिक पात्रता-
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून पीजीसह MBBS पदवी किंवा समकक्ष पात्रता असावी. अर्जदाराने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया किंवा कोणत्याही स्टेट मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. पीजी पदवी असलेल्या उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव असावा. पीजी डिप्लोमा पदवी असलेल्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित स्पेशलायझेशनमध्ये किमान 5 वर्षांचा अनुभव असावा.

आवश्यक वयोमर्यादा-
अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६९ वर्षांपेक्षा कमी असावे.

निवड प्रक्रिया-
भरती अधिसूचनेनुसार, उमेदवारांची निवड वॉक-इन मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अर्जदारांना सर्व वैध कागदपत्रे आणि कार्यानुभव प्रमाणपत्रासह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.

मुलाखतीचा पत्ता –
उमेदवारांना वैद्यकीय अधीक्षक कक्ष, ESIC मॉडेल हॉस्पिटल बेलटोलास गुवाहाटी- 781002 येथे मुलाखतीसाठी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे लागेल.

पगार-
पूर्णवेळ तज्ञांसाठी 1 लाख 6 हजार प्रति महिना वेतन मिळेल.
अर्धवेळ तज्ञांसाठी 60,000 रुपये महिना वेतन मिळेल.

follow us