Download App

उन्हाळ्यातील आय स्ट्रोक अन् कायमचा अंधपणा; कशी काळजी घ्यावी वाचा सविस्तर…

Eye stroke हा डोळ्यांशी संबंधित अत्यंत गंभीर आजार आहे. या आजारामध्ये कधी-कधी कायमचा अंधपणा येण्याची देखील शक्यता असते.

Eye stroke and permanent blindness in summer how to take care : सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे उष्णतेने प्रचंड लाही लाही होत आहे. यातूनच अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. त्यामध्येच एक आजार आहे. तो म्हणजे आय स्ट्रोक. हा डोळ्यांशी संबंधित अत्यंत गंभीर आजार आहे. या आजारामध्ये कधी-कधी कायमचा अंधपणा येण्याची देखील शक्यता असते. मात्र असा कुठलाही प्रकार आपल्या सोबत होऊ नये. यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घेऊ सविस्तर…

ट्रेलरवरून ठरवू नका; फुले चित्रपटावरील वादानंतर दिग्दर्शक अन् अभिनेत्याचं आवाहन

आय स्ट्रोक नेमका काय आहे?

आय स्ट्रोक हा जेव्हा डोळ्याला रेटीनामध्ये रक्तपुरवठा करणारी नस ब्लॉक होते. त्यातून अचानक व्यक्तीची नजर जाते. ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे. त्यामुळे यावर तात्काळ लक्ष देणे गरजेचे असते. तसेच रेटीनाला योग्य पद्धतीने काम करण्यासाठी ऑक्सिजनयुक्त रक्ताची गरज असते. मात्र अशाप्रकारे रक्तपुरवठा बंद झाल्यास अंधपणा येण्याची देखील शक्यता निर्माण होते.

आय स्ट्रोक ची लक्षणे काय?

– अचानक डोळ्यासमोरील गोष्टी दिसण्यास समस्या निर्माण होते.
-डोळ्यांना कोणताही त्रास न होताच ही दृष्टी कमी व्हायला सुरुवात होते
– धुरकटपणा काळपटपणा डोळ्यांसमोर अंधाऱ्याने
– प्रकाशाकडे पाहताना अत्यंत संवेदनशीलता जाणवणे

आय स्ट्रोकची कारण काय?

– शरीरामध्ये रक्ताच्या गाठी होणे
-रक्तवाहिन्या आकुंचन पावणे
-आर्टरीज मध्ये ब्लॅक जमा होणे
– एम्बोलिज्म

या आजाराचा कोणत्या लोकांना जास्त धोका?

या आजाराचा धोका त्या लोकांना जास्त आ.हे ज्या लोकांना अगोदरच डोळ्यांचे आजार आहे. त्याचबरोबर इतर आजार आहेत. जसे की उच्च रक्तदाब, डायबिटीस, एथेरोक्लेरोसिस, हाय कोलेस्ट्रॉल या लोकांना या आजाराचा धोका जास्त आहे. त्याचबरोबर ग्लुकोमा धूम्रपान करणारे लोक यांना देखील या आजाराचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे हा आजार तात्काळ ओळखणे हा यावरील पहिला इलाज आहे. तसेच डोळ्यांवर येणारा हा स्ट्रोक शरीराच्या इतर अवयवांवर देखील येऊ शकतो त्यावर देखील लक्ष देणे गरजेचे.

follow us