ट्रेलरवरून ठरवू नका; फुले चित्रपटावरील वादानंतर दिग्दर्शक अन् अभिनेत्याचं आवाहन

Pratik Gandhi and Anant Mahadevan on Upcoming Film Phule Issue : महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित हिंदी मध्ये हा चित्रपट येत आहे. मात्र यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी हा चित्रपट जातीयवाद निर्माण करणारा आहे. असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉरने कात्री लावली.
मात्र चित्रपटामध्ये वेगळं काहीही दाखवलं गेलं नाही. जे सत्य आहे तेच दाखवलं गेलं आहे. त्यामुळे वाईट प्रसिद्धी करून चित्रपटाबाबत गैरसमज पसरवू नये. असं आवाहन या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि अभिनेता प्रतीक गांधी यांनी घेतली आहे. तसेच यावेळी माध्यमांना बोलताना या दोघांनीही आवाहन केला आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांनी पूर्ण बघावा त्यानंतरच त्यांचं मत बनवावं ट्रेलर बघून कोणतही अनुमान लावू नये.
…तर राजीनामा देईल, थेट पत्रकार परिषदेत खासदार बजरंग सोनवणे असं का म्हणाले?
आम्ही यामध्ये सगळं काही बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अनेक पुस्तक वाचण्यात आली आहेत आणि सगळ्या महत्त्वाच्या घटना या चित्रपटामध्ये दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पूर्ण चित्रपट बघावा आणि त्यानंतरच आपली भूमिका ठरवावी असा आवाहन प्रेक्षकांना चित्रपट दिग्दर्शकांनी अभिनेत्याकडून करण्यात आले आहे. तसेच यावेळी त्यांनी या चित्रपटातील कोणताही सीन्स सेन्सॉर बोर्डने कट केला नाही. असं देखील हे दोघे म्हणाले आहेत.
पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा ठिय्या आंदोलन! अचानक रस्त्यावर उतरल्यानं पोलिसांची धांदल
झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Krantijyoti Savitribai Phule) यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी महात्मा फुले यांची जयंतीही आहे.
दिग्दर्शक आणि कलाकारांचं उत्तम सादरीकरण
या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत नारायण महादेवन यांनी केलं आहे. ऐतिहासिक विषयावर दमदार हातखंडा असलेल्या महादेवन यांनी याआधीही अनेक महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. महात्मा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम 1992’ फेम प्रतीक गांधी (Prateik Gandhi) दिसणार असून, सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा साकारत आहे. या दोघांनी या भूमिकांसाठी विशेष तयारी केली असून, त्यांच्या दमदार अभिनयामुळे ही ऐतिहासिक पात्रं जिवंत होतील, असा विश्वास आहे. विनय पाठक हेदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.