मोदींच्या वाढदिवसाचं कव्हरेज थांबवण्यासाठी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना; भाजपचा आरोप

Navnath Ban यांनी मोदीच्या वाढदिवशीच मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना घडली. या प्रकरणाचा बोलविता धनी समोर यावे. अशी मागणी त्यांनी केली.

Navnath Ban on UBT and Meenatai Thackrey statue issue

Navnath Ban on UBT and Meenatai Thackrey statue issue: बुधवारी 17 सप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस पार पडला. यानिमित्त जगभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या. दुसराकडे याच दिवशी मुंबईमध्ये शिवाजी पार्क परिसरामध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञातांकडून लाल रंग फेकल्याची घटना घडली. त्यावरून भाजपने उद्धव ठाकरेंच्या पक्षावर आरोप केले आहेत.

मोदींचं कव्हरेज थांबवण्यासाठी विटंबना…

नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मोदीजींच्या वाढदिवशीच पुतळ्याची विटंबना घडली हे संशयास्पद आहे. भाजपाचे देशभर कार्यक्रम सुरू असताना जनतेपर्यंत कव्हरेज पोहचू नये यासाठी जाणीवपूर्वक कारस्थान रचले का? अशी शंका आहे. आरोपी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्याचा नातेवाईक असल्याने या प्रकरणाचा सखोल तपास करून बोलविता धनी कोण हे समोर यावे. अशी मागणी त्यांनी केली.

‘त्या’ नियमांचे उल्लंघन केल्यास आता ट्रम्पच उपटणार पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे कान!

त्याचबरोबर नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सांगितलं की, बाळासाहेब ठाकरे यांचं महत्व कमी केलं असेल तर ते उबाठा गटाने आणि राऊत यांनीच केलं आहे. बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करीन. पण आज उबाठा गटाने काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. हे बाळासाहेबांना कधीच रुचलं नसतं. त्यामुळे बाळासाहेबांचा वैचारिक वारसा संपवणाऱ्यांना त्यांच्या नावाने बोलण्याचा कवडीचाही अधिकार नाही, असा घणाघात त्यांनी केला.

गाडी नदीत फेकली, नंतर मरण्याची अ‍ॅक्टिंग! कोट्यवधींच्या कर्जापासून बचावासाठी भाजप नेत्याच्या मुलाचा फिल्मी ड्रामा

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग…

मुंबईमध्ये शिवाजी पार्क परिसरामध्ये एक वादग्रस्त घटना घडली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञातांकडून लाल रंग फेकल्याची घटना घडली. त्यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला होता. बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत माहिती मिळतात स्थानिक शिवसैनिकांकडून मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकावरील लाल रंग थीनर टाकून काढला गेला. तसेच या विटंबनेबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेने आरोप केला आहे की, कुणी तरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला होता.

follow us