‘त्या’ नियमांचे उल्लंघन केल्यास आता ट्रम्पच उपटणार पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे कान!

US Parliament bill for Pakistan हे विधेयक विशेषत: पाकिस्तानी सैन्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणले जात आहे.

Letsupp (38)

US Parliament bill for Pakistan if Human rights violations action on pak government and Army Officials : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष कायम आहे. त्यातून अनेकदा दहशतवाद आणि हल्ले होत असतात. त्याच ताज उदाहरण म्हणजे काश्मीरच्या पहगाममध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला. यावर महासत्ता असलेल्या अमेरिकेने दाखील हस्तक्षेप केल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता नियमांचे उल्लंघन केल्यास अमेरिका पाकिस्तानचे कान उपटणार आहे. यासाठी अमेरिकेच्या संसदेत एक विधेयक मांडण्यात आले आहे.

काय आहे हे विधेयक?

अमेरिकेच्या संसदेत एक द्विपक्षीय विधेयक मांडण्यात आले आहे. पाकिस्तानचे स्वातंत्र्य आणि जबाबदारी अधिनियम (एचआर 5271) असं या विधेयकाचं नाव आहे. पाकिस्तानमधील मानवधिकारांचं उल्लंघन, सैन्य आणि सरकारी अधिकाऱ्यांवर कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. हे विधेयक विशेषत: पाकिस्तानी सैन्य आणि वरिष्ठ अधिकाऱअयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणले जात आहे.

गाडी नदीत फेकली, नंतर मरण्याची अ‍ॅक्टिंग! कोट्यवधींच्या कर्जापासून बचावासाठी भाजप नेत्याच्या मुलाचा फिल्मी ड्रामा

दरम्यान अमेरिकेचा हा कायदा ग्लोबल मॅग्निट्स्की ह्यूमन राइट्स अकाऊंटेबिलिटी (2016) आहे. ज्याद्वारे अमेरिकन सरकारला जगभरातील देशांमध्ये केल्या जाणाऱ्या मानवधिकारांचं उल्लंघन, भ्रष्टाचारी व्यक्ती आणि संस्थांवर जप्ती आणणे, व्हिसा बंदी, अर्थिक निर्बंध लावण्याचा अधिकार मिळतो. या विधेयकातून पाकिस्तानमधील लोकशाही आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी नियम घालून दिले आहेत.

आरबीआयने बदलला भाडं भरण्याचा नियम, भाडेकरूंना धक्का; ‘ही’ सेवा झाली बंद

दरम्यान गेल्या काही महिन्यापुर्वी पहलगाम हल्ल्याच्या वेळी अमेरिकेने भारत पाकमध्ये मध्यस्थी करून युद्ध थांबवल्याचा दावा केला जात होता. त्याला भारताने दुजोरा दिला नाही. त्यानंतर टॅरिफयु्द्धामध्ये अमेरिकेने भारतावर कर लादला तर अमेरिका पाकिस्तान संबंध सुधारले होते. त्याचा भारताला तोटा होणार होता. मात्र आता या विधेयकानंतर पाकमध्ये होणाऱ्या मानवधिकारांचं उल्लंघन आणि लोकशाहीच्या पायमल्लीवर त्यातून अंतिमत: दहशतवादाला खातपाणी घालण्यावर निर्बंध येतील.

follow us