निलेश चव्हाण आरोपी नाहीच, त्यानेच वैष्णवीच्या बाळाची काळजी घेतली; हगवणेंच्या वकिलांचा युक्तिवाद

निलेश चव्हाण आरोपी नाहीच, त्यानेच वैष्णवीच्या बाळाची काळजी घेतली; हगवणेंच्या वकिलांचा युक्तिवाद

Nilesh Chavan is not an accused, he took care of Vaishnavi’s baby; Hagavane’s lawyers argue : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असून आतापर्यंत या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर आता आज पुणे न्यायालयात या प्रकरणात (Vaishnavi Hagawane) सुनावणी पार पडली. यावेळी राजेंद्र हगवणे आणि कुटुंबाच्या वकीलांनी युक्तिवाद करत त्यांची बाजू मांडली. त्यावेळी त्यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात तिचं बाळ ज्याच्याकडे होतं त्या निलेश चव्हाणला आरोपी करणे चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले हगवणे कुटुंबाचे वकील?

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला सहआरोपी करणे चुकीचं आहे. या उलट त्याने बाळाची काळजीच घेतली. त्याचबरोबर निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही. त्यामुळे त्याला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आलं आहे. असं म्हणत हगवण्यांच्या वकिलाने निलेश चव्हाणच्या बाजूने युक्तिवाद केला.

राज्य सरकारचा मोठा निर्णय, अतिवृष्टी मदत व बचाव कार्यासाठी ‘या’ जिल्ह्यांमध्ये NDRF, SDRF पथके तैनात

तर निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिष्माचा मित्र आहे. त्याचबरोबर त्याची पार्श्वभूमी देखील छळ आणि गुन्हेगारीचीच आहे. ज्यामध्ये त्याने स्वतःच्याच पत्नीचा छळ केल्याची तक्रार त्याच्या पत्नीकडून देण्यात आली होती. त्यानंतर 2022 मध्ये त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता. त्याचबरोबर याहूनही धक्कादायक म्हणजे त्याने त्याच्या पत्नीचेच स्पाय कॅमेऱ्याने आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केले होते. तर वैष्णवीच्या प्रकरणामध्ये वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त करणे त्याचबरोबर बंदुकीचा धाक दाखवत तिच्या बाळाची हेळसांड करणे. हे आरोप करण्यात आलेले आहेत.

इस्रायली सैन्याची मोठी कारवाई, हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिनवार ठार, PM नेतन्याहू यांची घोषणा

तसेच या सुनावणी दरम्यान एकाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे तो छळ होत नाही असा युक्तीवाद राजेंद्र हगवणेंच्या (Rajendra Hagawane) वकिलाने केला आहे. तसेच वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत चॅट सुरु होते आम्ही ते पकडले होते. असा युक्तीवाद देखील राजेंद्र हगवणेंच्या वकिलाकडून करण्यात आला आहे. तर आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत, 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी वैष्णवीचा कशाला छळ करु? असं देखील आज पुणे न्यायालयात (Pune Court) राजेंद्र हगवणेंच्या वकिलांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube