पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर स्वयंपाकातील तेल 10 टक्क्यांनी कमी करण्यासाटी फॉलो करा या टिप्स

reduce cooking oil consumption पंतप्रधान मोदींनी भारतीय कुटुंबांना स्वयंपाकात वापरले जाणारे तेल 10 टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन केले.

Reduce Cooking Oil Consumption

Reduce Cooking Oil Consumption

Follow these tips to reduce cooking oil consumption by 10 percent after Prime Minister Modi’s appeal : भारतीय स्वयंपाकात तेलाचा वापर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. फोडणीपासून भाजी, करी, पराठे आणि तळलेले पदार्थ यांपर्यंत जवळपास प्रत्येक पदार्थात तेलाचा वापर होतो. मात्र, गरजेपेक्षा जास्त तेल सेवन केल्यास शरीरात अतिरिक्त कॅलरी जमा होतात आणि लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल वाढणे तसेच हृदयविकारासारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.

ग्राहकांना धक्का! सोनं 11 हजार तर चांदी प्रतिकिलो 30 हजाराने वाढली; नेमकं कारण काय?

पंतप्रधान मोदींनी भारतीय कुटुंबांना स्वयंपाकात वापरले जाणारे तेल 10 टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, यामुळे वैयक्तिक आरोग्य सुधारेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मदत होईल. हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे आवाहन केलं. या आवाहनाला पार्श्वभूमी जरी अमेरिका-इराण युद्धामुळे जगासह भारतावर ओढावलेल्या आर्थिक संकटाची असली तरी देखी स्वयंपाकातील तेलाचा वापर कमी करणे फायदेशीरच आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, तेल कमी करणे म्हणजे चवीशी तडजोड करणे नाही. दैनंदिन स्वयंपाकात काही साधे बदल करून कमी तेलातही चविष्ट आणि आरोग्यदायी जेवण बनवता येते.

तेल कमी करणे का आवश्यक आहे?

भारतीय पदार्थांमध्ये तेलाचा वापर स्वयंपाक, तळणे आणि फोडणीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. शरीराला काही प्रमाणात चांगल्या फॅट्सची गरज असली तरी नियमितपणे जास्त तेल सेवन केल्यास हृदयविकार, वजन वाढ आणि पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. तज्ज्ञ सांगतात की, तेल पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्याचा प्रमाणित वापर करणे महत्त्वाचे आहे.

तेल कमी करण्यासाठी 8 सोपे उपाय

1. कमी तेल लागणारी भांडी वापरा

नॉन-स्टिक, सिरॅमिक कोटेड किंवा नीट तयार केलेली कास्ट आयर्नची भांडी वापरल्यास कमी तेलातही पदार्थ सहज बनतात. अन्न भांड्याला चिकटत नाही आणि स्वयंपाक हलका होतो. कास्ट आयर्नच्या भांड्यांमुळे अन्नातील लोहतत्त्वही वाढू शकते.

2. तेल थेट बाटलीतून ओतू नका

अनेकदा आपण अंदाजाने तेल वापरतो आणि प्रमाण जास्त होते. मोजण्याचा चमचा वापरल्यास तेलाचे प्रमाण नियंत्रणात राहते. रोज फक्त 1-2 चमचे तेल कमी केले तरी दीर्घकाळात मोठा फरक पडू शकतो.

3. पर्यायी स्वयंपाक पद्धती वापरा

डीप फ्राय करण्याऐवजी ग्रिलिंग, बेकिंग, रोस्टिंग, स्टीमिंग, एअर फ्रायिंग, या पद्धती वापरता येतात आजकाल एअर फ्रायरचा वापर समोसे, कटलेट आणि भजी कमी तेलात बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होतो.

4. परतताना पाणी किंवा स्टॉक वापरा

कांदा, टोमॅटो, आलं-लसूण परतताना भरपूर तेल वापरण्याऐवजी थोडे तेल घेऊन त्यात थोडे पाणी, दही किंवा भाज्यांचा स्टॉक टाकल्यास पदार्थ चांगले शिजतात. ही पद्धत भाजी, करी आणि ग्रेव्हीसाठी उत्तम आहे.

5. मसाले आणि हर्ब्सने चव वाढवा

जास्त तेल म्हणजे जास्त चव, ही समजूत चुकीची आहे. कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, काळी मिरी, मोहरी, आलं, लसूण, लिंबाचा रस, या गोष्टींमुळे चव उत्तम येते भाजून घेतलेले मसाले तर पदार्थाला अधिक उठावदार चव देतात.

6. तळलेले पदार्थ कमी करा

भजी, समोसे, टिक्की यांसारखे डीप फ्राय पदार्थ मोठ्या प्रमाणात तेल शोषून घेतात. त्यामुळे हे पदार्थ बेक किंवा एअर फ्राय करून बनवले तर तेलाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.

7. वाढण्यापूर्वी अतिरिक्त तेल काढा

तळलेले पदार्थ टिश्यू पेपरवर ठेवल्यास जास्तीचे तेल शोषले जाते. तसेच करी किंवा ग्रेव्हीच्या वर तरंगणारे तेल चमच्याने काढून टाकता येते.

8. ऑइल स्प्रे किंवा ब्रश वापरा

पॅनवर थेट तेल ओतण्याऐवजी ऑइल स्प्रे किंवा सिलिकॉन ब्रश वापरल्यास तेल समान पसरते आणि प्रमाणही कमी लागते. पराठे, डोसे आणि चिल्ल्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरते.

NEET पेपरफुटी प्रकरणाचं अहिल्यानगर कनेक्शन! आरोपीचा साथीदार लोखंडे ताब्यात, चौकशी सुरू

स्वयंपाकातील तेल कमी करणे म्हणजे जीवनशैलीत मोठे बदल करणे नव्हे. भांडी, स्वयंपाकाची पद्धत आणि घटकांची निवड यामध्ये छोटे बदल केल्यास कुटुंबाचे आरोग्य सुधारू शकते. मोदी यांच्या या संदेशामुळे संतुलित आहार आणि सजग स्वयंपाकाच्या सवयींबाबत चर्चा वाढली आहे. थोड्या शहाणपणाने केलेले बदल आरोग्यदायी जीवनाकडे मोठे पाऊल ठरू शकतात.

Exit mobile version