Download App

फुकटचं इंटरनेट महागात पडणार? सार्वजनिक वायफाय धोकादायक, ‘ही’ काळजी घ्या अन्यथा मोठं नुकसान…

Free Internet Dangerous While Using Public Wifi : फुकटच्या गोष्टी कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच मोफत मिळणाऱ्या गोष्टी वापरायला (Free Internet) आवडतात. इंटनेटचा (Internet) सुद्धा या यादीत नंबर लागतो. अनेकदा आपण कॅफे, विमानतळ, रेल्वे स्टेशन किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वायफाय उपलब्ध असते, तेव्हा काहीही विचार न करता ते वापरतो. परंतु मित्रांनो हेच फुकटचं इंटरनेट (Wifi) आपल्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते.

जर आपण सार्वजनिक वायफाय वापरताना काळजी घेतली नाही, तर आपले वैयक्तिक तपशील चोरीला जाऊ शकतात. मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊ या.

वैष्णवी हगवणेंचं बाळ सुखरूप, वैष्णवीच्या आई-वडिलांकडे करणार सुपूर्द; पडद्यामागे काय घडलं?

सार्वजनिक वायफाय सुरक्षित का आहे?

सार्वजनिक वायफाय नेटवर्क बहुतेक असुरक्षित असतात. हॅकर्स या नेटवर्कद्वारे डेटा चोरू शकतात. जेव्हा तुम्ही सार्वजनिक वायफाय वापरत असताना ऑनलाइन बँकिंग करता, ईमेल पाठवता किंवा सोशल मीडियावर लॉग इन करता तेव्हा तुमचा लॉगिन आयडी, पासवर्ड आणि इतर महत्त्वाची माहिती हॅकर्सकडून मिळवता येते. ते तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीचे निरीक्षण करू शकतात किंवा तुमच्या डिव्हाइसवर मालवेअर इन्स्टॉल करू शकतात.

सार्वजनिक वायफाय वापरताना काळजी घ्या

VPN वापरा: VPN (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) तुमचे इंटरनेट कनेक्शन सुरक्षित करते आणि तुमचे तपशील एन्क्रिप्ट करते. यामुळे हॅकर्सना तुमची माहिती मिळवणे कठीण होते.

व्यवहार टाळा: सार्वजनिक वायफाय वापरून ऑनलाइन बँकिंग, खरेदी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार टाळा. यामुळे तुमचे क्रेडिट कार्ड आणि इतर महत्त्वाचे तपशील चोरीला जाण्यापासून वाचू शकतात.

फेकन्यूज? दहशतवादी संघटनेच्या संपर्कात… हिसार पोलिसांनी गुप्तहेर ज्योती मल्होत्राबाबत केला मोठा खुलासा

HTTPS असलेल्या वेबसाइट वापरा: नेहमी HTTPS ने सुरू होणाऱ्या वेबसाइटना भेट द्या कारण या वेबसाइट अधिक सुरक्षित असतात.

सॉफ्टवेअर अपडेट ठेवा: तुमच्या डिव्हाइसची ऑपरेटिंग सिस्टम, ब्राउझर आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा, यामुळे कोणतेही नवीन धोके टाळण्यास मदत होऊ शकते.

संशयास्पद नेटवर्क टाळा: विचित्र नावे असलेल्या किंवा बरेच लोक वापरत असलेल्या कोणत्याही वायफाय नेटवर्कशी कनेक्ट होऊ नका, कारण हे नेटवर्क बहुतेकदा असुरक्षित असतात.

जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही मोठे नुकसान टाळू शकता. अन्यथा मोफत वस्तूंच्या मागे लागणे तुमचे नुकसान करू शकते.

 

follow us