Download App

सायबर हल्ला होण्यापूर्वीच थांबविला; गूगलच्या एआय (AI) एजंटची कमाल

Google’s AI Agent Stopped Cyber Attack : तंत्रज्ञान कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. गेल्या काही वर्षांत हे तंत्रज्ञान वेगाने विकसित झाले आहे. वैद्यकीय शास्त्रापासून ते कोणत्याही समस्येवर ( Cyber Attack) उपाय शोधण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये एआय (AI) मॉडेल्सचा वापर केला जात आहे. असे काही क्षेत्र आहेत, जिथे एआय (AI) मानवांच्या बरोबरीने काम करत आहेत.

एआय नंतर आता एआय एजंट्सबद्दल चर्चा सुरू आहे. गुगलने एआयच्या (Google’s AI Agent) क्षमतांचा विस्तार करत एक नवीन एआय एजंट लाँच केला आहे. हा एआय एजंट कोणताही सायबर हल्ला होण्यापूर्वीच थांबविण्यास सक्षम आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक्स वर ही माहिती दिली आहे.

196 लोकांची चौकशी, 286 मोबाईल नंबरांची तपासणी; महादेव मुंडे प्रकरणी विधानसभेत CM फडणवीसांचा मोठा खुलासा

बिग स्लीपने थांबविला सायबर हल्ला
सायबर हल्ला थांबविण्याचे काम गुगलच्या बिग स्लीप या एआय एजंटने केले आहे. जे गुगलच्या डीपमाइंड आणि प्रोजेक्ट झिरो अंतर्गत विकसित केले गेले आहे. या एआय एजंटचे काम कोणत्याही सॉफ्टवेअरमधील त्रुटी शोधून काढणे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, या एआय एजंटने पहिली सुरक्षा भेद्यता शोधली आणि सायबर सुरक्षेत एआय कशी मदत करू शकते हे दाखवून दिले. गुगलने एका ब्लॉगपोस्टमध्ये या एजंटबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ तर्फे श्री क्षेत्र आळंदीत ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’ चे आयोजन

एआय एजंटने सायबर हल्ला कसा रोखला?
गुगलने म्हटले आहे की, बिग स्लीपने अनेक नवीन सुरक्षा त्रुटी शोधल्या आहेत. थ्रेट इंटेलिजेंस आणि बिग स्लीपचा वापर करून गुगलने एक अशी सुरक्षा त्रुटी रोखली आहे जी आतापर्यंत समोर आली नव्हती. याचा अर्थ असा की, कोणालाही कळण्यापूर्वीच सुरक्षेतील दोष काढून टाकण्यात आले.

सुरक्षा त्रुटी शोधण्यासाठी बिग स्लीपचा वापर कधीपासून सुरू झाला याबद्दल गुगलने माहिती दिलेली नाही. याचा अर्थ कंपनी गेल्या काही काळापासून एआय एजंटची चाचणी घेत आहे. यासोबतच गुगलने थ्रेट डिटेक्शनमध्ये एआयचा वापर आणि प्रभाव दाखवून दिला आहे.

 

follow us