Download App

Government Schemes : खावटी अनुदान योजना आहे तरी काय?

Government Schemes : खावटी अनुदान योजना (Khawati Subsidy Scheme)ही राज्य सरकारने अनेक वर्षांपूर्वी सुरू केली होती. मात्र काही कारणास्तव 2013-14 मध्ये बंद करण्यात आली. कोरोनाच्या काळात खावटी अनुदान योजना राज्य सरकारने पुन्हा सुरु केली. या योजनेअंतर्गत राज्य सरकार आदिवासी वर्गातील कुटुंबांना चार हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. देशात कोरोना महामारीमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तसेच त्यांची काम बंद झाली. त्यांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागलं. अशा कुटुंबांना आर्थिक मदत (financial aid)म्हणून राज्य सरकारने ही योजना पुन्हा सुरू केली.

जरांगेंच्या गंभीर आरोपावर मंत्री देसाई म्हणतात; जरांगेंचा काहीतरी गैरसमज झाला असावा…

अनुदान योजनेचा लाभ काय?
या योजनेअंतर्गत राज्य सरकार आदिवासी कुटुंबांना चार हजार रुपयांची आर्थिक मदत देणार आहे.
सुमारे 11 लाख 54 हजार लोकांना या अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारने जवळपास 486 कोटी रुपयांचं बजेट असणारी ही योजना एका वर्षासाठी सुरु केली.
ही आदिवासी अनुदान रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.

IAS बालाजी मंजुळे : धडाकेबाज अधिकाऱ्याच्या ‘हिरो ते झिरो’ प्रवासाची गोष्ट

आवश्यक पात्रता काय?
अर्जदार व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक.
अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक.
आदिवासी जे मनरेगामध्ये काम करणारे लोक
एक दिवसासाठी कार्यरत असणारे मजूर
घटस्फोटित महिला
विधवा
भूमिहीन कुटूंब
दिव्यांग व्यक्तींचे कुटूंब
अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटूंब
आदिम जमातीचे कुटूंब
आदिवासी वर्गातील लोक
पारधी जमातीचे लोक

फायदे काय?
योजनेचा राज्यातील चार लाख कुटुंबांना फायदा होणार.
या योजनेमध्ये जिल्हा अधिकाऱ्याने घोषित केलेल्या महिला. त्यामध्ये घटस्फोटित महिला,विधवा, भूमिहीन कुटुंबे, अपंग व्यक्तींचे कुटुंब अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटूंब असे एकूण तीन लाख जणांना याचा फायदा होणार आहे.
आदिम जमातीचे 2 लाख 26 हजार कुटूंब यांचा समावेश केला आहे.
भूमिहीन, शेतमजूर त्याचबरोबर वैयक्तिक हक्क धारण करणारे कुटुंबाच्या जवळपास 1 लाख 65 हजार कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार.
अशा प्रकारे एकूण आदिवासी समाजतील 11 लाख 55 हजार लोकांना त्याचा फायदा होणार.

अनुदान विवरण :
प्रत्येक कुटुंबाला चार हजारांची रोख रक्कम दिली जाईल. तिचे वितरण 50-50 टक्क्यांमध्ये करण्यात आले आहे. लाभार्थी व्यक्तीला अनुदानित रकमेपैकी 50 टक्के रक्कम मिळणार आहे, त्याचबरोबर 50 टक्के रक्कम वस्तूरुपात मिळणार.
दोन हजार रुपये किंमतीची रोख रक्कम त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होणार होणार.
काही व्यक्तींचे बँकेमध्ये खाते नसते, तर या अकाउंट नसणाऱ्या लोकांसाठी पण त्यांनी एक सोय केली आहे. गावांमध्ये डाक विभागात खात्यामध्ये जर त्याने अकाउंट असेल, तर त्या अकाउंटमधून त्यांना ते दोन हजार रुपये मिळणार आहेत. बाकी दोन हजार रुपयांचा वस्तू स्थितीमध्ये फायदा होणार.
कुटुंबातील प्रमुख महिला आहे तिला दोन हजार रुपयांच्या किराणामाल दिला जातो. त्याच्यामध्ये मटकी, चवळी, हरभरा, तेल, डाळी यासारख्या वस्तू आहेत, त्या-त्या व्यक्तीच्या महिलेच्या हातामध्ये सोपवण्यात येईल. अशाप्रकारे त्या कुटुंबाला या योजनेचा फायदा होणार आहे.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन कुठे करावे?
तुम्हाला महाडीबीटी पोर्टल वरून देखील या योजनेसाठी रजिस्ट्रेशन आणि अर्ज करता येईल.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

Tags

follow us