Government Schemes : महाराष्ट्र (Maharashtra)राज्यातील सर्व तालुक्यात रोपवाटिका स्थापन करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पाचशे लाभार्थींची निवड केली जाते. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका उभारण्याचे प्रास्तावित आहे. शेतकऱ्यांच्या (Farmer)आर्थिक उत्पन्न आणि भाजीपाला उत्पादनात वाढ करणे, हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
मोठी बातमी! रशिया तत्काळ युद्ध थांबवण्यास तयार; युक्रेनसमोर ठेवल्या ‘या’ दोन अटी
रोपवाटिका अनुदान योजनेसाठी अटी :
– रोपवाटिका उभारण्यासाठी अर्जदाराकडे पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे.
– अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक.
– त्याचा सातबारा उतारा आवश्यक आहे.
– योजनेंतर्गत रोपवाटिका पूर्णपणे नव्याने उभारावी लागेल.
– या घटकांतर्गत यापूर्वी शासनाचा लाभ घेतलेले खासगी रोपवाटिका धारक, शासनाचा लाभ न घेता उभारलेल्या खासगी रोपवाटिकाधारक तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोखरा किंवा इतर कोणत्याही योजनेतून संरक्षित शेत शेडनेट व हरितगृह घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.
Jigraa on OTT: ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येईल आलिया भट्टचा ‘जिगरा’
लाभार्थी निवड :
– यामध्ये लाभार्थींची निवड करताना महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य दिले जाते.
– महिला बचत गट किंवा महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य.
– भाजीपाला उत्पादक तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी किंवा शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य दिले जाते.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
– अर्ज
– कृषी पदवीबाबत कागदपत्रे
– शेतकरी गट नोंदणी प्रमाणपत्र
– बँक खाते पासबुक छायांकित प्रत
– सातबारा उतारा
– आठ-अ प्रमाणपत्र
– स्थळ दर्शक नकाशा
– आधार कार्डची छायांकित प्रत
– चतुसिमा
– अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती शेतकरी यांच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र
हमीपत्र.
योजनेसाठी अर्ज कुठे करावा? :
या योजनेसाठी इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी या
शेतकऱ्यांचे महाडीबीटी या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन अर्ज स्वीकारणार आहेत.
संपर्क कुठे करावा?
– तालुका कृषी अधिकारी
-https://mahadbt.maharashtra.gov.in/