Government Schemes : महाराष्ट्रातील (Maharashtra)सर्व तालुक्यात रोपवाटिका स्थापन करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पाचशे लाभार्थींची निवड केली जाते. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका (Nursery)उभारण्याचे प्रास्तावित आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न आणि भाजीपाला उत्पादनात वाढ करणे, हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
Raashi Khanna : ‘योद्धा’नंतर अॅक्शन मूवी! राशी खन्नाच्या चित्रपटांची यादी मोठी
रोपवाटिका अनुदान योजनेसाठी अटी :
– रोपवाटिका उभारण्यासाठी अर्जदार लाभार्थीकडे पाण्यची कायमची सोय असणे आवश्यक.
– अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक.
– त्याचा सातबारा उतारा आवश्यक आहे.
– योजनेंतर्गत रोपवाटिका पूर्णपणे नव्याने उभारावी लागेल.
– या घटकांतर्गत यापूर्वी शासनाचा लाभ घेतलेले खासगी रोपवाटिका धारक, शासनाचा लाभ न घेता उभारलेल्या खासगी रोपवाटिका धारक तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोखरा किंवा इतर कोणत्याही योजनेतून संरक्षित शेत शेडनेट व हरितगृह घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.
ठाकरेंची यादी जाहीर होताच काँग्रेसचा भडका; “उद्धवजी हे योग्य नाही, फेरविचार करा”, थोरातांचा संताप
लाभार्थी निवड :
– यामध्ये लाभार्थींची निवड करताना महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे.
– महिला बचत गट किंवा महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य.
– भाजीपाला उत्पादक तसेच अल्प व अत्यल्प भूदारक शेतकरी किंवा शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहिल.
प्रकल्पासाठी अर्थसहाय्य ^https://images.letsup.app/news_images/1687172512.webp^
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
– अर्ज
– कृषी पदवीबाबत कागदपत्रे
– शेतकरी गट नोंदणी प्रमाणपत्र
– बँक खाते पासबुक छायांकित प्रत
– सातबारा उतारा
– आठ-अ प्रमाणपत्र
– स्थळ दर्शक नकाशा
– आधार कार्डची छायांकित प्रत
– चतुसिमा
– अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती शेतकरी यांच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र
हमीपत्र.
योजनेसाठी अर्ज कुठे करावा? :
या योजनेसाठी इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी या
शेतकऱ्यांचे महाडीबीटी या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन अर्ज स्वीकारणार आहेत.
संपर्क कुठे करावा
– तालुका कृषी अधिकारी
-https://mahadbt.maharashtra.gov.in/
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)