Raashi Khanna : ‘योद्धा’नंतर अ‍ॅक्शन मूवी! राशी खन्नाच्या चित्रपटांची यादी मोठी

Raashi Khanna : ‘योद्धा’नंतर अ‍ॅक्शन मूवी! राशी खन्नाच्या चित्रपटांची यादी मोठी

Raashi Khanna : बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्नाच्या अभिनयाची (Raashi Khanna) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राशी खन्नाने सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर (Sidharth Malhotra) ‘योद्धा’ मध्ये आपल्याला दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. तिच्या या अभिनयाची चर्चा चित्रपटसृष्टीत होत आहे. राशीने या चित्रपटातील भूमिकेसाठी विविध शैलींचा अभ्यास केला. प्रचंड मेहनत घेतली. यानंतर राशीला आणखी अॅक्शन चित्रपटात काम करायचं आहे, असे राशीने सांगितले.

फक्त अॅक्शन चित्रपटच नाही तर तिला मोठ्या पडद्यावर पौराणिक पात्रही साकारायचे आहे. काही वर्षांपूर्वी बाहुबली हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने भारतीय सिनेमाला नवा आयाम मिळवून दिला. या चित्रपटातील कलाकारांच्या भुमिकांचीही मोठी चर्चा झाली. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शेट्टीसारखी व्यक्तिरेखा साकारायला मला आवडेल. एका सरकारी अधिकाऱ्याच्या भूमिकेबद्दल कौतुकाचा वर्षाव केल्यानंतर राशी एक उत्तम अभिनेत्री आहे हे तिनं दाखवून दिलं आहे. अष्टपैलू अभिनेत्री कामाच्या आघाडीवर, सध्या अनेक मनोरंजक प्रकल्पांची वाट पाहत आहे.

Ram Charan अन् सुकुमारच्या प्रोजेक्टला संगीत देण्यास रॉकस्टार डीएसपी सज्ज!

पॅन इंडियाचा युवा स्टार विक्रांत मॅसीसोबत ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘टीएमई’मध्ये राशी खन्ना दिसणार आहे. या सोबतच राशीकडे तमिळ चित्रपट ‘अरनमानाई 4’ आणि तेलुगू चित्रपट ‘तेलुसू काडा’ देखील आहेत. योद्धा चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि राशी खन्ना यांच्यातील केमिस्ट्री पहायला मिळाली. राशीच्या पुढील रिलीजमध्ये ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि विक्रांत मॅसीसोबत ‘टीएमई’ यांचा समावेश आहे. आता या चित्रपटातील राशी खन्नाच्या दमदार अभिनयाची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube