Government Schemes : राज्यातील (maharashtra)अनुसूचित जातीच्या (SC) लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण (Training in Animal Husbandry)देऊन कौशल्य विकास वृद्धीसाठी वैयक्तिक लाभाची योजना सुरु करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मान्सून देणार शेतकऱ्यांना दिलासा! कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा लेटेस्ट अपडेट
योजनेसाठी अटी :
– प्रशिक्षण कालावधी 3 दिवसांचा राहील.
– प्रशिक्षणासाठी अर्जदारास जनावरांच्या प्रक्षेत्रावर, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, शेळी मेंढी विकास महामंडळ, भारतीय कृषि औद्योगीक प्रतिष्ठान, कृषि व पशुवैद्यकीय महाविद्यालय या ठिकाण अथवा प्रक्षेत्रावर प्रशिक्षण घेणे शक्य नसल्यास इतर ठिकाणी सोईनुसार प्रशिक्षणास उपस्थित रहावे लागेल.
– प्रशिक्षणार्थींना प्रक्षेत्रावरच प्रात्यक्षिक काम करावे लागेल.
– यात प्रक्षेत्रावरील गायी म्हशीचे व्यवस्थापन यामध्ये मुख्यत: संकरीत पैदाशीचे, तंत्रज्ञान, ऋतूचक्र, माज ओळखणे, कृत्रिम रेतन, गाभण गाई/ म्हशींची निगा, जन्मलेल्या वासरांचे संगोपन, खाद्य-वैरणीचे प्रकार व उत्पादन तंत्रज्ञान, दुग्धस्पर्धा स्वच्छ दुग्धोत्पादन, जनावरांना होणारे रोग व त्यानुसार रोगप्रतिबंधक लसीकरण, औषधोपचार,सहकारी संस्थेचे सभासदत्त्व आदी बाबतची माहिती घ्यावी लागेल.
– शेळ्यांमध्ये संकरीत पैदास, जन्मलेल्या करडाची जोपासना, नर विक्रीबाबत बाजार व्यवस्था व शेळीपालन प्रकल्प अर्थशास्त्र याबाबतची माहिती घ्यावी लागेल.
– प्रशिक्षणार्थींना प्रगतीशील शेतकऱ्यांकडे सहल / बचत गटांना भेटी देणे, त्यानुसार त्यांचेकडील जनावरांच्या जोपासनेबाबत प्रात्यक्षिक पहाणे.
– जवळच असलेली प्रक्षेत्रे दुधमहासंघ, शेळ्या मेंढयाचे प्रक्षेत्रे यांना भेटी देणे आवश्यक आहे.
Ankita Lokhande : स्वातंत्रवीर सावरकरनंतर अंकिता लोखंडे दिसणार आणखी एका बायोपिकमध्ये…
लाभाचे स्वरूप :
– प्रशिक्षण कालावधीत एका लाभार्थीवर रु.1,००० /- मर्यादेपयंर्तचा खर्च खालीलप्रमाणे-
– लाभार्थ्यांना चहा, नाष्टा जेवण 300 (रु.100/- प्रतिदिवस)
जाण्या येण्याचा खर्च (एसटी / रेल्वे तिकीट पाहुन) :100/-
पेन, नोंदवही, छापील तांत्रिक माहिती : 100/-
– दृकश्राव्य व्यवस्था प्रचार, बॅनर्स, चार्टस (ट्रेनिंग एड मटेरीयल अंतर्गत) प्रशिक्षणार्थी बैठक व्यवस्था हॉल इ. अनुषंगिक खर्च : 500/-
एकूण : 1000 रुपये…
आवश्यक कागदपत्रे :
– लाभार्थीं निवडताना संबंधीत ग्रामपंचायतीची शिफारस प्राप्त करून घेणे बंधनकारक राहील.
– फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
– जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
संपर्क कार्यालयाचे नाव :
– पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती
– जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद
– जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)