Government Schemes : आज आपण पाईपलाईन अनुदान योजना (Pipeline Subsidy Scheme)या अंतर्गत शेतकऱ्यांना कसा लाभ मिळतो? यासाठी अटी-शर्ती काय आहेत?, याचा अर्ज कसा करायचा? या सर्वांबद्दलची माहिती आपण येथे पाहणार आहोत. जसे की कोरडवाहू क्षेत्र राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (National Food Security Mission)या प्रकारच्या योजना देखील महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत राबवले जातात. तसेच पीव्हीसी पाईप किंवा एचडीपीए पाईपसाठी देखील याठिकाणी अनुदान दिले जाते.
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला; नवीन 70 रुग्ण आढळले
या योजनेअंतर्गत 50 टक्के किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये एवढे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. ज्यामध्ये पीव्हीसी पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर आणि जास्तीत जास्त 15 हजार रुपये त्याच बरोबर एचडीपीए साठी 50 रुपये प्रति मीटर जास्तीत जास्त 15 हजार रुपये या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते.
ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम; पेट्रोलचा टॅंकर येणार नसल्याच्या भीतीने पंपावर तोबा गर्दी
एचडीपी पाईपसाठी अर्ज केले असता जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते तसेच पीव्हीसी पाईपसाठी अर्ज केला असता जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते.
यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करत असताना आपल्याकडे असणारा सिंचनाचा स्त्रोत याबद्दलची माहिती प्रविष्ट करणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये शेततळे, विहीर किंवा इतर कोणत्या मार्गाने आपण सिंचन करत असाल तर त्याबद्दल ची माहिती सादर करणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल. अन्यथा असे अर्ज वर्षानुवर्ष तसेच पडून राहतात. त्यावर कोणतीही पुढील कारवाई होत नाही त्याच बरोबर आपल्या सातबाराला देखील या सिंचनाची नोंद असणे बंधनकारक आहे.
अर्ज भरल्यानंतर महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते. त्यामध्ये आपले नाव असल्यास आपल्याला प्राथमिक स्वरूपामध्ये काही कागदपत्रे सादर करावी लागतात. ज्याच्या मध्ये आपल्या जमिनीचा सातबारा, ८अ, बँकेचे पासबुक व ज्या ठिकाणी आपण पाईप खरेदी करणार आहोत त्या डीलरशिप चे कोटेशन इत्यादी माहिती सादर करावी लागते.
पाईप लाईन योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा? :
– महाडीबीटी पोर्टल वर गेल्यानंतर आपल्या आधार क्रमांकाने किंवा युजर आयडीने लॉग इन करा. त्यानंतर कृषी योजना या बटन वर क्लिक करा. त्यानंतर ‘अर्ज करा’ या बटन वर क्लिक करा.
– त्यानंतर सिंचन साधने व सुविधा यापुढे ‘बाबी निवडा’ हे बटन आहे त्यावर कृपया क्लिक करा. सिंचन साधने व सुविधा यांच्या अंतर्गत आपल्याला तालुका, गाव/शहर, सर्वेक्षण क्रमांक/गट क्रमांक, मुख्य घटक, बाब, उपघटक, परिमान, कपलर व्यास या बाबी गरजेनुसार निवडा.
– त्यानंतर ‘सहमत आहे’ या बॉक्स वर क्लिक करून ‘जतन करा’ या बटन वर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल तेथे yes किंवा No लिहिलेले असेल त्या ‘No’ बटन वर क्लिक करा.
– त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये ‘अर्ज सादर करा’ असे लिहिलेले असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर ‘पहा’ या बटन वर क्लिक करा. त्यानंतर आपल्या योजनेचा प्राधान्यक्रम निवडावा आणि ‘सहमत आहे’ या बटन वर क्लिक करून अर्ज सादर करा.
– या योजनेसाठी आपण 23 रुपये 60 पैसे जर पेमेंट केले असेल तरच आपला अर्ज हा यशस्वीपणे सादर केला जाईल.
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.