Download App

Government Schemes : कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र (Agricultural Mechanization Scheme)शासनामार्फत राबविण्यात येणारी राज्यस्तरीय योजना आहे. यायोजनेंतर्गत कृषी उपकरणांवर अनुदान दिले जाते. जर एखाद्या शेतकऱ्याने कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेऊन मानवशक्तीवर चालणारी कृषी उपकरणं (Agricultural equipment)खरेदी केली असतील, तर त्याला या योजनेतून अनुदान मिळू शकतात. ही योजना राज्य शासनाच्या ‘मिशन ऑन अॅग्रीकल्चर मेकॅनायझेशन (एनजीटी)’ या अभियानांतर्गत तयार केली आहे. राज्यातील (Maharashtra)शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

राहुल गांधी महाराष्ट्रात येताच काँग्रेसला भगदाड; भाजपाचा झेंडा हाती घेणारे पद्माकर वळवी कोण ?

योजनेसाठी आवश्यक पात्रता काय?
– महाराष्ट्रात राहणारा कोणताही शेतकरी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज करू शकतो.
– कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेणारा शेतकरी हा महाराष्ट्रातील कायमस्वरुपीचा रहिवाशी असावा.
– ज्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांची स्वत:ची शेतजमीन असणे आवश्यक.
– लाभार्थ्याकडे खतावनीसह जमिनीची सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
– अनुदान थेट अनुदानित बँकेत दिले जाते, त्यानंतर बँक खात्याचे पासबुक देखील आवश्यक आहे.
– अर्जदाराकडे आधार कार्ड आणि पॅनकार्डसारखी आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

आमदार धंगेकर आणि रासनेंमध्ये ‘बॅनरवॉर’, धंगेकरांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधान

अनुदान किती मिळते?
अल्प व अत्यल्प भुधारक,अनुसूचित जाती/जमाती आणि महिला शेतकरी यांना 50 टक्के अनुदान मिळते आणि इतर शेतकरी यांना 40 टक्के अनुदान मिळते.
– राईस मिल, दाल मिल , पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्वरायजर/पॉलीशरच्याबाबतीत अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा यांना 60 टक्के व इतर लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान आहे.
– अनुदानासाठी GST रक्कम गृहित धरण्यात येत नाही.
– त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी औजारे बँक स्थापन करण्यासाठी 40 टक्के, 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते.
– अशाप्रकारे कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
– शेतकऱ्याचे आधार कार्ड.
– बँक पासबुक.
– 7/12 आणि 8 अ उतारा
– खरेदी केलेल्या उपकरणाचे मूळ बिल.
– ट्रॅक्टर शेतकऱ्याच्या नावावर असेल तरच अनुदान दिले जाईल.
– कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 साठी पात्र
शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
– जमीन शेतकऱ्याच्या नावावर असावी.
– अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास त्यांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
– ट्रॅक्टरसाठी अनुदान आवश्यक असल्यास ट्रॅक्टर शेतकऱ्याच्या नावावर असावा.

अनुदान मिळण्याची प्रक्रिया
– यंत्र/औजारे खरेदी करताना स्वत:च्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने/धनादेश/धनाकर्षाद्वारे विक्रेत्यास रक्कम देणे बंधनकारक आहे.
– खरेदी केल्यानंतर शेतकऱ्याने बील (जीएसटी क्रमांका सह) महाडीबिटी पोर्टलवर अपलोड करावे.
– त्यानंतर शेतास प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अधिकारी मोका तपासणी करतील व देय अनुदानाची शिफारस केली जाईल.
– पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना देय अनुदान लाभार्थीचे थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.

या संकेतस्थळावर संपर्क साधा :
krishi.maharashtra.gov.in ला भेट द्या.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us