Govt.Schemes : असंघटित क्षेत्रात काम करणार्या मजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर उदरनिर्वाहासाठी केंद्र सरकारने (Central Govt) पेन्शन योजना सुरु केली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana)आहे. त्यामध्ये मजूर, वीटभट्टी, पादत्राणे बनवणारे, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, कपडे धुणारे, रिक्षाचालक, जमीन नसलेले मजूर, विडी कामगार आणि रोजंदारी कामगार यांना पेन्शन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मासिक 15,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मजुरांना या योजनेत समाविष्ट केले जाईल.
‘शरद पवारांनीच देशात पहिलं महिला धोरण आणलं’; Rohit Pawar यांनी करुन दिली आठवण
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत मजुरांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना मासिक 3 हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्याची योजना आहे. या दरम्यान पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास, पेन्शनच्या 50 टक्के रक्कम जोडीदाराला दिली जाईल.
Ahmednagar Crime : एलसीबीकडून शाहरुखला अटक! गावठी कट्टा घेऊन फिरताना आढळला…
‘या’ योजनेचा लाभ कसा मिळवावा?
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी मजुरांना नोंदणी करावी लागेल. सरकारी आकडेवारीनुसार देशभरात असंघटित क्षेत्रात सुमारे 42 कोटी मजूर काम करतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे आणि 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये गुंतवावे लागतील. कामगाराचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून पेन्शन सुरू होईल.
हे लोक करू शकणार नाहीत अर्ज :
EPFO, NPS आणि ESIC चे सदस्य प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत अर्ज करू शकणार नाहीत. याशिवाय करदात्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत केवळ असंघटित क्षेत्रातील कमी वेतनावर काम करणार्या मजुरांनाच लाभ मिळू शकतो.
अर्ज कसा करावा :
– प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी http://www.maandhan.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर सेल्फ एनरोलमेंट वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर Proceed वर क्लिक करा.
– नाव, ई-मेल आणि कॅप्चा कोड टाका आणि जनरेट OTP वर क्लिक करा. OTP टाका.
– यानंतर अर्जाचे पान उघडेल. मागितलेली माहिती नोंदवा आणि सबमिट करा.
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.