नवउद्योजकांना ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी

Pune : राज्यातील सर्व महाविद्यालयीन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ च्या माध्यमातून नवउद्योजक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील महाविद्यालय व औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टपर्यंत व संस्थांना 15 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. तरी या कार्यक्रमात […]

District Skill Development, Employment And Entrepreneurship Guidance Centres

District Skill Development, Employment And Entrepreneurship Guidance Centres

Pune : राज्यातील सर्व महाविद्यालयीन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ च्या माध्यमातून नवउद्योजक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील महाविद्यालय व औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टपर्यंत व संस्थांना 15 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. तरी या कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून करण्यात आले आहे.(govt schemes Maharashtra Student Innovation Challenge opportunity to participate in the competition College ITI student )

कर्जत MIDC वादात नवा ट्विस्ट! रोहित पवारांनी टाळलं राजकीय क्रेडिट; शिंदेंनाही सुनावलं

राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 जाहीर करण्यात आले आहे.

लग्न समारंभात बॉलीवूडची गाणी वाजवल्यानं कॉपीराईटचं उल्लंघन होतं?; केंद्राचे स्पष्ट निर्देश

या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी कार्यरत आहे. या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासाकरिता पोषक वातावरण निर्मिती करुन त्यातून यशस्वी नवउद्योजक घडवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’चे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये उमेदवार वैयक्तिक किंवा जास्तीत जास्त तीन जणांच्या समूहामध्ये सहभागी होता येणार आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे नाविन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे. उपक्रम हा शैक्षणिक संस्था, जिल्हा तसेच राज्य स्तरावर संपन्न होणार आहे. याद्वारे विजेत्या उमेदवारांना बीज भांडवल उपलब्ध होणार आहे. त्यासह विशेष इनक्युबेशन प्रोग्रामचा लाभ घेता येणार आहे.

जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी तसेच शैक्षणिक संस्थांनी https://schemes.msins.in या संकेतस्थळाला भेट देऊन विहीत मुदतीत स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्र.सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.

Exit mobile version