लग्न समारंभात बॉलीवूडची गाणी वाजवल्यानं कॉपीराईटचं उल्लंघन होतं?; केंद्राचे स्पष्ट निर्देश

लग्न समारंभात बॉलीवूडची गाणी वाजवल्यानं कॉपीराईटचं उल्लंघन होतं?; केंद्राचे स्पष्ट निर्देश

Copyright Infringement : लग्न सोहळ्यात, पार्ट्यांमध्ये बॉलिवूडची गाणी वाजवली जातात. विशेषतः लग्न सोहळ्यात हळद, संगीत अशा विविध कार्यक्रमांमध्ये तीन-चार दिवस नुसता धिंगाणा असतो. त्यावेळी आनंद साजरा करण्यासाठी डीजेवर, मोठमोठ्या आवाजात बॉलिवूडची गाणी वाजवली जातात. पण असं असलं तरी आपण जी गाणी वाजतो, ती फ्रीमध्येच ना… म्हणून मग त्यावर अनेक कंपन्यांकडून कॉपीराईटचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. मग आता आपण अशा कार्यक्रमांमध्ये जी मोठ-मोठ्या आवाजात गाणी वाजवतो, ती कॉपीराईटचं उल्लंघन करतात का? तर त्याबद्दल केंद्र सरकारकडे विविध तक्रारी आल्यानंतर सरकारकडून याबद्दल स्पष्ट निर्देश दिले आहेत.(bollywood songs playing at wedding ceremonies copyright infringement Clarification of Central Govt)

छत्रपती संभाजीनगरमध्ये वन संरक्षक भरतीचा पेपर फुटला, एकाला अटक, 7 जणांविरूध्द गुन्हा दाखल

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, हॉटेल्स आणि उत्सव आयोजित करणाऱ्या आयोजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कॉपीराईट कंपन्यांकडून याबद्दल आवाज उठवला होता.

कर्जत MIDC वादात नवा ट्विस्ट! रोहित पवारांनी टाळलं राजकीय क्रेडिट; शिंदेंनाही सुनावलं

लग्न सोहळ्यांमध्ये बॉलीवूडची गाणी वाजवल्यास कॉपीराईटचा भंग होत असल्याची अनेकदा सरकारकडे तक्रारी करण्यात आल्या. याबद्दल डिपार्टमेंट फॉर प्रमोशन इंडस्ट्री अॅण्ड इंटरनल ट्रेडकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या. सरकारकडे लग्न समारंभ आयोजित करणाऱ्या आणि अन्य स्टेकहोल्डर्सकडून तक्रारी आल्या होत्या की त्यांच्याकडून रॉयल्टी मागितली जात आहे.

लग्नात व्हिडीओ शूटमध्ये या गाण्यांचा वापर केल्याने कॉपीराईट अॅक्ट 1957 च्या कलम 51(1)(ZA)या कलमामध्ये कोणत्याही अधिकृत किंवा धार्मिक कार्यक्रमात ड्रामॅटीक, म्युझिकल किंवा अन्य परफॉर्म केला तर ते कॉपीराईटचे उल्लंघन होत नसल्याचे म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube