प्रधानमंत्री वय वंदना पेन्शन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Govt.Schemes : प्रधानमंत्री वय वंदना पेन्शन योजनेंतर्गत (Pradhan Mantri Vaya Vandana Pension Yojana) 60 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांनी मासिक पेन्शनची निवड केलेली आहे, त्यांना दहा वर्षांसाठी 8 टक्के व्याज मिळेल आणि जर त्यांनी वार्षिक पेन्शनचा 8.03 टक्के व्याज मिळेल. प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळेल. या […]

Pradhanmantri Vay Vandana Yojana

Pradhanmantri Vay Vandana Yojana

Govt.Schemes : प्रधानमंत्री वय वंदना पेन्शन योजनेंतर्गत (Pradhan Mantri Vaya Vandana Pension Yojana) 60 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांनी मासिक पेन्शनची निवड केलेली आहे, त्यांना दहा वर्षांसाठी 8 टक्के व्याज मिळेल आणि जर त्यांनी वार्षिक पेन्शनचा 8.03 टक्के व्याज मिळेल. प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळेल. या योजनेंतर्गत गुंतवणुकीची कमाल मर्यादा आधी 7.5 लाख होती, ती आता वाढवून 15 लाख करण्यात आली आहे.

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांचं राष्ट्रीय पुरस्काराबद्दलचं ‘ते’ ट्वीट चर्चेत

देशातील ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर व्याज देऊन त्यांना ही पेन्शन दिली जाईल. या योजनेद्वारे देशातील ज्येष्ठ नागरिक स्वावलंबी होतील, आणि त्यांना वृद्धापकाळी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

Hasan Mushrif : उद्धव ठाकरेंना आमदारांनी का सोडलं? मुश्रीफांनी पहिल्यांदाच थेट उत्तर दिलं

पेन्शन रक्कम किती?
– वार्षिक किमान पेन्शन : 12 हजार रुपये तर जास्तीत जास्त 1,11,000 रुपये
– सहामाही किमान पेन्शन : सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त 55, 500 रुपये.
– तिमाही किमान पेन्शन : तीन हजार रुपये जास्तीत जास्त पेन्शन 27,750 रुपये.
– मासिक किमान पेन्शन : एक हजार रुपये तर जास्तीत जास्त पेन्शन 9 हजार 250 रुपये.

योजनेचे निश्चित व्याजदर काय असणार?
मासिक व्याज दर : 7.40 टक्के
तिमाही व्याज दर : 7.45 टक्के
सहामाही व्याज दर : 7.52 टक्के
वार्षिक व्याज दर : 7.60 टक्के

पंतप्रधान वंदना योजना कर्जय सुविधा :
आपण पंतप्रधान वय वंदना योजनेंतर्गत कर्ज देखील मिळू शकते. हे कर्ज पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षानंतर मिळू शकते. या योजनेंतर्गत आपल्याला देय रकमेच्या 75 टक्क्यांपर्यंत रक्कम दिली जाईल. या कर्जावरील व्याजदर 10 टक्क्यांपर्यंत आकारला जाईल.

योजनेची वैशिष्ट्ये :
– या योजनेच्या पॉलिसीची मुदत 10 वर्षांची आहे.
– दरमहा 1000 रुपये असणारी किमान पेन्शन तीन हजार रुपये, सहा हजार रुपये/ सहामाही, 12 हजार रुपये/ वर्षाचे असेल. तसेच जास्तीत जास्त 30 हजार रुपये/ तिमाही 60 हजार रुपये/ सहामाही 1 लाख 20 हजार रुपये वार्षिक असेल.
– प्रधानमंत्री वय वंदना 2021 अंतर्गत ज्येष्ठ नागरिक जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवू शकतात.
– पीएमव्हीव्हीवाय योजना देशातील ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळाची उत्पन्नाची सुरक्षा प्रदान करण्यासाठी देशात राबवली जाते.
– पीएमव्हीव्हीवाय योजना 2021 अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे वय किमान 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
– या योजनेंतर्गत लाभधारकाला जीएसटी कर भरावा लागणार नाही.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेसाठी पात्रता :
– अर्जदार हा भारताचा कायम रहिवासी असावा.
– अर्जदाराचे किमान वय 60 वर्षे असावे. या योजनेंतर्गत कोणतीही वयाची मर्यादा नाही.

योजनेची कागदपत्रे :
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट आकाराचा फोटो
वयाचा पुरावा
उत्पन्नाचा दाखला
बँक खाते पासबुक
रहिवासी पुरावा
मोबाईल नंबर

अधिक माहितीसाठी या ठिकाणी संपर्क साधा :
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सेंट्रल ऑफिस योगक्षेम जीवन विमा मार्ग
नरिमन पॉईंट मुंबई 400021
संपर्क दूरध्वनी : 022 6827 6827

Exit mobile version