Hasan Mushrif : उद्धव ठाकरेंना आमदारांनी का सोडलं? मुश्रीफांनी पहिल्यांदाच थेट उत्तर दिलं

Hasan Mushrif : उद्धव ठाकरेंना आमदारांनी का सोडलं? मुश्रीफांनी पहिल्यांदाच थेट उत्तर दिलं

Hasan Mushrif Criticized Uddhav Thackeray : राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेना सुद्धा हिंदुत्ववादीच पक्ष होता. अडीच वर्ष त्यांच्याबरोबर आम्ही सत्तेत होतो. सहकार्य केलं. पण, त्यांना आपलीच माणसं टिकवता आली नाहीत. त्यामुळे सत्ता गेली अशी टीका मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. आताच्या सरकारमध्ये का सहभागी झालो याचेही उत्तर त्यांनी देऊन टाकले.

‘कापशीची चप्पल बसली की कळेल त्याला’; मुश्रीफांनी आव्हाडांना धुतलं

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, मी अजित पवार यांच्यासोबत आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर सत्तेत सहभागी झालो आहोत. आम्ही सत्तेत का गेलो याचा खुलासा अजित पवार यांनी सुद्धा केला आहे. आजही महाविकास आघाडीत शिवसेना असली तरी त्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही. तरीही आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो. याआधी पाचवेळा आम्ही भाजपबरोबर चर्चा केली होती.

एक हिंदुत्ववादी पक्ष सोडला आता दुसऱ्या हिंदुत्ववादी पक्षासोबत आम्ही गेलो आहोत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा विस्तार करण्याच्या उद्देशानेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. 45 आमदार आणि दोन ते तीन खासदार जातात याचा अर्थ हा निर्णय सर्वांनी घेतल्याचे मुश्रीफ म्हणाले. 

‘अजितदादा उपमुख्यमंत्रीपदासाठी कायम तयार, मला त्यांची दया येते’; कोश्यारींचा खोचक टोला

कापशीची चप्पल बसली की कळेल त्याला

जेव्हा एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले, तेव्हाच राष्ट्रवादीच्या 53 आमदारांनी शरद पवारांना (Sharad Pawar) पत्र लिहीलं होतं की आम्हालाही सत्तेत जाण्याची परवानगी द्या. म्हणजे गृहनिर्माण खातं किती हृदयाला कवटाळून बसले होते. मग तेव्हा कशी सही केली होती तुम्ही? कोल्हापुरात कोल्हापुरी चप्पल नाही, कापशाची चप्पल प्रसिद्ध आहे. ती करकर वाजते. ती बसली की कळेल त्याला, असा टोला मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी लगावला.

ईडीच्या कारवाईबाबतही मुश्रीफांनी सांगितलं

जानेवारी महिन्यात ईडीची माझ्यावर कारवाई झाली. त्यानंतर आम्ही न्यायालायातूनच सातत्याने दिलासा मिळवला आहे. आमच्यावर तशी कोणतीच कारवाई झाली नाही. दुसरं म्हणजे अनेक लोकांवर अशी पद्धतीच्या कारवाया झाल्या त्यावेळी सहानुभूती नावाचाही काही प्रकार असतो तो माझ्याबाबतीत मात्र दिसला नाही. ठीक आहे आम्ही आमचा प्रॉब्लेम दूर करू. 2014 मध्ये ईडी होती का, मग आम्ही पाठिंबा का दिला? 2017 ला ईडी होती का तर नव्हती 2019 ला 2022-23 ला ज्यावेळी आम्ही सह्या केल्या त्यावेळी सुद्धा ईडी नव्हती. त्यामुळे सरकारसोबत जाण्याचा निर्णय आम्हा सगळ्यांचा होता असे मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube