Health Warning about Sleep : झोप एक नैसर्गिक आणि मानसिक प्रक्रिया आहे. यामुळे शरीर आणि मेंदूला आराम मिळतो. ज्यावेळी आपण झोपलेलो (Sleep) असतो त्यावेळी आपले शरीर ऊर्जेला पुन्हा रिस्टोर करते. पेशींची दुरुस्ती करते आणि मेंदूतील विविध माहिती प्रोसेस केली जाते. झोपेदरम्यान शरीर आणि मेंदू मध्ये काही विशिष्ट बदल होत असतात. जसे की श्वास आणि हृदयाची गती कमी होणे. स्नायूंना आराम मिळणे, मेंदूत विचारांची प्रक्रिया मंद होणे.
अनेक लोक असे आहेत ज्यांना पडल्या पडल्या लगेच झोप लागते. तर काही लोकांना तासनतास झोप येत नाही. नुकत्याच झालेल्या एका सर्वेत झोपेबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. ज्या लोकांना पाच मिनिटात किंवा त्यापेक्षाही कमी वेळात झोप येते असे लोक एखाद्या गंभीर समस्येने ग्रस्त असू शकतात. पाच मिनिटांच्या आत झोप येणे म्हणजेच अशा व्यक्तीची झोप पुरेशा प्रमाणात होत नाही याचे संकेत असू शकतात. बऱ्याचदा अशी परिस्थिती खराब झोप किंवा अपुरी झोप यामुळे होऊ शकते.
18 ते 64 वर्षे वयोगटातील लोकांनी प्रत्येक दिवशी 9 तासांची झोप घेणे आवश्यक आहे अशी स्लीप हेल्थ फाउंडेशनची शिफारस आहे. परंतु प्रत्येक वेळी ही गोष्ट शक्य होईल असेही नाही. प्रत्येक पाच व्यक्तींपैकी एका व्यक्तीला पूर्ण झोप मिळत नाही. यामुळे अशा लोकांना कमी झोपेची समस्या निर्माण होते. याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते.
सावधान! आताच ‘ही’ सवय बदला नाहीतर बहिरे होताल; आरोग्य मंत्रालयाचा इशारा, राज्यांना धाडले पत्र
सातत्याने कमी झोप होत असेल तर अनेक गंभीर शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यामध्ये हृदयरोग, लठ्ठपणा, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, नैराश्य आणि अल्झायमर अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
आरोग्य तज्ज्ञांनी एक वेळ मर्यादा निश्चित केली आहे. झोप येण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो याची माहिती यातून मिळते. तसेच तुमच्या आरोग्याबाबतही माहिती मिळते. पाच मिनिटांच्या आत जर झोप येत असेल तर अशी परिस्थिती गंभीर जोखीम म्हणून ओळखली जाते. झोप येण्याची हेल्दी रेंज पाच मिनिट ते 20 मिनिट असते. खूप लवकर झोपून जाणे नार्कोलेप्सीसारख्या मेडिकल कंडीशनचे संकेत असू शकते. तसेच झोप येण्यासाठी जर तुम्हाला 20 ते 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर तुम्हाला अनिद्रेची समस्या असू शकते.
झोपेच्या कमतरते मागे अनेक कारणे असू शकतात. जर तुम्हाला याबाबत लक्षात येत नसेल तर वेळेनुसार ही समस्या अधिक गंभीर होण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचं ठरेल.
रात्रीच्या वेळी गोंगाट, मोबाईल, टीव्ही सुरू असणे, टॅबलेटची स्क्रीन लाईट तसेच बाहेरून येणारा प्रकाश यामुळे झोप येत नाही. ज्यावेळी तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करत असता त्यावेळी तुमच्या आयुष्यात घडलेली एखादी घटना तुम्हाला विचलित करू शकते. यामुळे सुद्धा झोपमोड होते आणि मग बराच वेळ झोप येतच नाही. याव्यतिरिक्त एखादे व्यसन असणे तसेच फिजिकली ऍक्टिव्ह नसणाऱ्या सवयी सुद्धा झोपेत व्यत्यय आणू शकतात.
आता बारीक व्हाच! ‘लठ्ठ’ नागरिकांमुळे भारताची अर्थव्यवस्था धोक्यात?; काय सांगतो अहवाल
जर तुम्हाला झोप येत नसेल तर एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. तज्ञ व्यक्ती तुम्हाला झोप का येत नाही यामागच्या कारणांचा शोध घेऊन त्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन करतील.