सावधान! आताच ‘ही’ सवय बदला नाहीतर बहिरे होताल; आरोग्य मंत्रालयाचा इशारा, राज्यांना धाडले पत्र

सावधान! आताच ‘ही’ सवय बदला नाहीतर बहिरे होताल; आरोग्य मंत्रालयाचा इशारा, राज्यांना धाडले पत्र

Earphone Use : जर तुम्ही तासनतास कानात इअरफोन आणि हेडफोन घालत असाल तर आताच सावध व्हा. कारण यामुळे तुमची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. तसेच तुम्ही लवकर बहिरे होण्याची दाट शक्यता राहील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. मंत्रालयाने याबाबतीत सर्व राज्यांना एक पत्र लिहिले आहे. विशेष करून युवकांना हा इशारा देण्यात आला आहे. कारण हेडफोनचा सर्वाधिक वापर याच वर्गाकडून केला जातो. राज्य सरकार आणि वैद्यकीय महाविद्यालयांनी याबाबत जनजागृती करावी अशा सूचना आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत.

डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्विस प्रा. अतुल गोयल यांनी मुलांचा स्क्रीन टाइम कमी (Screen Time) करणे अतिशय महत्त्वाचे आहे असे सांगितले. सातत्याने मोबाईल पाहिल्याने मेंदूचा संज्ञानातम्क विकासात उशीर होऊ शकतो. यामुळे सोशल इंटरॅक्शन आणि कम्युनिकेशन वर परिणाम होऊ शकतो. 50 डेसिबल पेक्षा अधिक आवाज असणाऱ्या उपकरणांचा वापर करू नका. सारखे ऐकत राहू नका मधूनमधून ब्रेक घेत रहा.

कल्लाच! बड्स ब्लूटूथ शिवाय तर, हेडफोन वायरलेस होणार; सॅमसंगनं आणलेली भन्नाट टेक्नोलॉजी काय?

कानांना व्यवस्थित फीट होणारे किंवा आवाज रद्द करणारे हेडफोन वापरा. यामुळे ऑडिओ कमी प्रमाणात चालवता येईल. सोशल मीडियाचा वापर (Social Media) कमी करण्याचाही सल्ला डॉ. गोयल यांनी दिला आहे. ऑनलाइन गेम मुलांना आजिबात खेळू देऊ नका असेही गोयल यांनी सांगितले आहे. सार्वजनिक ठिकाणी आवाजाची तीव्रता सरासरी 100 डेसिबलपेक्षा जास्त राहणार नाही याची काळजी राज्य सरकारांनी घ्यावी अशा सूचना गोयल यांनी दिल्या आहेत. DGHS ने हे पत्र 20 फेब्रुवारी रोजी जारी केले होते.

या पत्रात म्हटले आहे की हा एक महत्त्वाचा मुद्दा असला तरी याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. हेडफोन आणि इयरफोनचा सातत्याने दीर्घकाळ वापर केल्याने ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. युवकांना तासनतास हेडफोन कानात घालण्याची सवय आहे. अगदी गावखेड्यातही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. या सवयीमुळे ऐकण्याच्या क्षमतेचे मोठे नुकसान होऊ शकते अशी माहिती अलीकडच्या काळात झालेल्या अभ्यासावरून मिळाली आहे.

एकदा का जर ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला तर पुन्हा ठीक होणे अत्यंत कठीण ठरू शकते. श्रवण शक्तीवर परिणाम झाला तर नंतर श्रवण यंत्र वापरून सुद्धा पहिल्या सारखी स्थिती पुन्हा येऊ शकत नाही. तेव्हा हेडफोन आणि इयरफोनचा वापर कमी करणे हाच यावर उत्तम उपाय आहे.

जीवन विमा पॉलिसी खरेदीदारांनो सावधान, दाव्याच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

follow us
  • fb
  • instagram
  • youtube