बापरे, आता युवकांतही वाढतोय ‘या’ कॅन्सरचा धोका; धक्कादायक अहवाल

बापरे, आता युवकांतही वाढतोय ‘या’ कॅन्सरचा धोका; धक्कादायक अहवाल

Appendix Cancer : आतापर्यंत अपेंडिक्स कॅन्सर एक दुर्मिळ आजार मानला जात होता. हा आजार (Appendix Cancer) प्रामुख्याने वयोवृध्द लोकांमध्ये आढळून येत होता. परंतु अलीकडेच झालेल्या एका अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता हा कॅन्सर युवकांतही वेगाने फैलावू लागला आहे. अपेंडिक्स मानवी शरीरातील पाचन तंत्राचा एक छोटा हिस्सा आहे. अपेंडिक्स म्हणजे मोठ्या आतड्यांशी जोडलेली एक बोटाच्या आकाराइतकी पिशवीसारखी संरचना असते. या अपेंडिक्सचे शरीरातील कार्य नेमके काय आहे याबाबत शास्त्रज्ञांत अजूनही एकमत नाही.

आता हेच अपेंडिक्स कॅन्सरचे रूप घेत आहे. यामुळे काळजी वाढली आहे. विशेष म्हणजे हा कॅन्सर युवकांतही अतिशय वेगाने वाढू लागला आहे. एनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिन नामक जर्नलमध्ये प्रकाशित एका अहवालानुसार सन 1970 नंतर जन्मलेल्या लोकांमध्ये अपेंडिक्स कॅन्सरच्या प्रमाणात तीन ते चार पट वाढ दिसून आली आहे. आधीच्या काळात कॅन्सर शक्यतो 50 वर्षांपुढील लोकांना होत होता. परंतु आता 30 आणि 40 वयातही कॅन्सर होऊ लागला आहे.

थोडी दिलाशाची बाबा म्हणजे अजूनही हा आजार कमी लोकांना होतो. प्रत्येक वर्षात दहा लाख लोकांमध्ये या कॅन्सरचे रुग्ण अतिशय कमी असतात. परंतु आता या आजाराची वाढती प्रकरणे सतर्क करू लागली आहेत. अपेंडिक्स कॅन्सरचे रुग्ण मोठ्या संख्येने का आढळून येत आहेत याचे कारण अजून समोर आलेले नाही. परंतु तद्न्य काही खास गोष्टींकडे इशारा करत आहेत.

Joe biden Cancer : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कर्करोगाचे निदान…

आजार का फैलावतोय

रिसर्च मध्ये नमूद करण्यात आले आहे की मागील काही दशकांत लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये मोठा बदल झाला आहे. 1970 च्या दशकांनंतर लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढली आहे. लठ्ठपणा अनेक प्रकारच्या कॅन्सरचे कारण बनला आहे. गरजेपेक्षा जास्त खाणे, गोड पेय, प्रोसेस केलेले मांस यांचे सेवन वाढले आहे. या सर्व गोष्टी पाचन तंत्राच्या कॅन्सरचा धोका वाढवतात.

लोकांचे चालण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच तासनतास टीव्ही पाहणे, मोबाईल वापरणे यांमुळे स्क्रीन टाइम वाढला आहे. यामुळे शरीरात मेटाबोलिजम गडबडले आहे. यामुळे देखील कॅन्सरचा धोका वाढला आहे. खाद्य पदार्थांत केमिकल्सचा वापर, प्लास्टिकचा अतिवापर, पाण्याच्या गुणवत्तेत घसरण आणि प्रदूषण ही देखील करणे ठरू शकतात.

अपेंडिक्स कॅन्सरचे निदान होणे कठीण का

कॅन्सर सर्जन डॉ. अंशुमान कुमार सांगतात की अपेंडिक्स कॅन्सरची सर्वात मोठी समस्या म्हणजे या आजाराचे लक्षण अतिशय अस्पष्ट असतात. सुरुवातीच्या लक्षणांत हलकी पोटदुखी, सूज येणे आढळू शकतात. ही लक्षणे अन्य आजारांतही दिसून येतात. त्यामुळे याकडे कधी गांभीर्याने पाहिले जात नाही. एखाद्या व्यक्तीला अपेंडिक्स कॅन्सर असावा असा अंदाज बांधून ऑपरेशन केले जाते. पण ऑपरेशन दरम्यान या आजाराचे निदान होते. परंतु तोपर्यंत आजार बराच पुढे निघून गेलेला असतो.

सध्या अपेंडिक्स कॅन्सरसाठी कोणतीही नियमित स्क्रिनिंग टेस्ट उपलब्ध नाही. हा आजार इतका दुर्मिळ आहे की यासाठी मोठ्या प्रमाणावर तपासणी सुविधा सुद्धा उपलब्ध करता आली नाही. त्यामुळे सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणे हाच सर्वात प्रभावी उपाय ठरू शकतो.

अहवालानुसार बदलती लाइफस्टाइल आणि वातावरणा दरम्यान शरीरात होणाऱ्या कोणत्याही बदलांकडे दुर्लक्ष करू नका. पोट वारंवार दुखत असेल, सूज असेल किंवा पाचन तंत्राशी संबंधित समस्या असेल तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.

थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी, आहारात ‘या’ सुपरफूड्सचा समावेश नक्की करा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube