कल्लाच! बड्स ब्लूटूथ शिवाय तर, हेडफोन वायरलेस होणार; सॅमसंगनं आणलेली भन्नाट टेक्नोलॉजी काय?
UWB Technology : गेम खेळण्यासाठी, व्हिडिओ कॉल करण्यासाठी किंवा इतर काही कामांसाठी अनेकजण ब्लूटूथ ऑडिओ डिवाइसचा (Bluetooth Audio Device) वापर करताना दिसतात. मात्र अनेकांना ब्लूटूथ ऑडिओ डिवाइसचा वापर करताना ‘लेटन्सी’ (Latency) ची समस्या येते. लेटन्सी म्हणजे स्क्रीनवर प्ले होणारा व्हिडिओ किंवा ऑडिओ पुढे जात आहे मात्र तुम्हाला त्याचा आवाज काही वेळानंतर ऐकू येते. त्यामुळे आज अनेक गेमर्स सोशल मीडियावर लेटन्सीची तक्रार करताना तुम्हाला पाहायला मिळेल.
तर दुसरीकडे या समस्यावर उपाय म्हणजे वायर्ड इयरफोन वापरणे पण आजकाल वायर्ड इयरफोन सहज उपलब्ध नाही. मात्र आता सॅमसंग (Samsung ) या समस्येवर उपाय आणत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सॅमसंग अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे जी ब्लूटूथ आणि वायर्डशिवाय ऑडिओ डिव्हाइस कनेक्ट करण्यास मदत करणार आहे.
बँड अल्ट्रा-वाइडबँड
बऱ्याच काळानंतर स्मार्टफोनच्या जगात काही नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे. नवीन तंत्रज्ञानाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंगने यू.एस. यूएस पेटंट अँड ट्रेड ऑफिस (U.S. Patent and Trade Office) येथे अल्ट्रा-वाइडबँड तंत्रज्ञानासह (Ultra-Wideband) ऑडिओ डिव्हाइससाठी पेटंट दाखल केले आहे.
91mobiles ने दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंग गेल्या काही वर्षांपासून या तंत्रज्ञानावर आधारित ऑडिओ प्रोडक्ट्सवर काम करत आहे. अल्ट्रा-वाइडबँड (UWB) बाजारात खूप जुनी तंत्रज्ञान आहे. कार अनलॉक करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. तसेच Apple देखील AirTags मध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
UWB मध्ये ऑडिओ फाइल्स 6.5-9 GHz फ्रिक्वेन्सीवर चालतात तर ब्लूटूथमध्ये ट्रान्सफर 2.4 GHz वर होते. जास्त फ्रिक्वेन्सी म्हणजे चांगला रिफ्रेश रेट. चांगला रिफ्रेश रेट म्हणजे नॅनोसेकंदांचा फरक देखील राहत नाही. UWB ची रेंज ब्लूटूथपेक्षाही मोठी आहे. ब्लूटूथची फ्रिक्वेन्सी 30 फूट फिरते तर UWB मध्ये ते 75 फूटापर्यंत पोहोचते. त्यामुळे आता UWB तंत्रज्ञानामुळे ऑडिओफाइलना मजा येणार आहे.
अनमोल बिश्नोई… व्हिडिओ कॉल अन् बाबा सिद्दीकींची हत्या, मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा
UWB कनेक्ट करण्यासाठी UWB ब्लूटूथची आवश्यकता असेल आणि त्यानंतर ऑडिओ फाइल्सचे ट्रान्सफर UWB द्वारे होणार. माहितीनुसार Galaxy Buds Pro मध्ये UWB तंत्रज्ञान दिसू शकते.