Horoscope 9 March : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
मेष : आजचा तुमचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे.
वृषभ : आजच्या दिवशी तुम्ही जे मोठे निर्णय घेणार आहात, ते पुढे ढकलावे लागतील. जोडीदाराचे वागणं काही प्रमाणात संशयास्पद वाटू शकतं.
मिथुन : आजच्या दिवशी घरासाठी केलेली जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. त्रास होत असेल तर विश्रांती घेणं फायदेशीर आहे.
कर्क: आजच्या दिवशी पार्टनरसोबत असलेलं भांडण संपणार आहे. सहलीला जाण्याचा बेत तुम्ही आज आखू शकता.
सिंह : आजच्या दिवशी मनाविरूद्ध कोणतेही निर्णय घेऊ नका. पैशांचा योग्य पद्धतीने वापर करा.
कन्या : आजच्या दिवशी तुमच्या मनात चांगले विचार येणार आहेत. परस्पर संबंधात तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
तूळ : आजच्या दिवशी बिझनेसच्या बाबतीत तुमच्या डोक्यात नव्या कल्पना येणार आहेत. तुमची जुनी इच्छा पूर्ण होणार आहे.
वृश्चिक : आजच्या दिवशी काहीही ऑनलाइन खरेदी करताना काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. योग्य दिशेने केलेले प्रयत्न चांगले परिणाम देतील.
धनू : आजच्या दिवशी कुटुंबामधील वाद कमी होणार आहेत. तुमच्या मेहनतीचं फळ आज मिळणार आहे. कोणत्याही मोठ्या गोष्टीचा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा.
मकर : आजच्या दिवशी अधिक नफा मिळवण्यासाठी कोणाचीही फसवणूक करू नका. तुमचं गुपित जवळच्या व्यक्तीशिवाय कोणत्याही इतर व्यक्तींना सांगू नका.
कुंभ : आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींना मनासारखा जोडीदार मिळू शकतो. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीची काळजी करा.
मीन : आजच्या दिवशी नवीन आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामामुळे मनस्ताप होण्याची दाट शक्यता आहे.