Download App

आजचा दिवस खास मात्र ‘या’ राशीच्या लोकांसाठी मात्र रेड अलर्ट! जाणून घ्या…

Horoscope आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य

Horoscope Today 30 June 2025 :आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन, ‘या’ मुद्द्यांवरून सभागृह गाजणार

मेष – मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. कारण आज या लोकांना आपल्यामध्ये आलेला आळस काहीसा दूर होतोय आणि उत्साह वाढतोय हे स्पष्ट जाणवेल तसेच नवीन संधी देखील या लोकांना मिळणार असल्याचं आजचे त्यांचे ग्रहमान सांगत आहेत.

महाराष्ट्र मंत्रालयात राजेशकुमार राज्याचे नवे मुख्य सचिव; या तारखेपासून सांभाळणार पदभार

वृषभ – त्यानंतर वृषभ या राशीच्या लोकांना देखील आजचा दिवस काहीसा दिलास देणारा ठरणार आहे. कारण या लोकांना आज जीवनात अर्थिक स्थैर्य आणि कौंटुंबिक स्थिरता मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

बांग्लादेश रडारवर! गंगा पाणी करारात बदल तर होणारच; मोदी सरकाचा प्लॅन नेमका काय?

कर्क- आज तुम्ही प्रेम आणि भावनांच्या प्रवाहात असाल. तुम्हाला मित्र, नातेवाईक आणि कुटुंबाकडून भेटवस्तू मिळू शकते. तुम्ही त्यांच्यासोबत आनंदाने तुमचा दिवस घालवू शकाल. प्रवास, चांगले जेवण आणि प्रियजनांच्या सहवासाने तुम्ही रोमांचित व्हाल. पत्नीच्या खास सहवासाने मन प्रसन्न राहील. बऱ्याच काळापासून सुरू असलेले मतभेदही दूर होतील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन काम मिळू शकते. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी विशेष फलदायी नाही.

मोठी बातमी ! अहिल्यानगरमध्ये बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस; 66 लाखांच्या नोटा जप्त

सिंह – दुसरीकडे सर्व राशींचा राजा मानल्या जाणाऱ्या सिंह राशीच्या लोकांना देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण या दिवशी त्यांची अडलेली कामे पुर्ण होतील. तसेच त्यांना हवा तो योग्य मान-सन्मान मिळेल. त्यातून यशाकडे वाटचाल होणार आहे.

पाकिस्तानला अफगाणिस्तानचा धसका! आत्मघाती हल्ल्यानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय

धनू – आजच्या दिवशी धनू राशीला मात्र रेड अलर्ट असणार आहे. त्यामुळे आजच्या खराब ग्रहस्थितीमध्ये या राशींच्या लोकांनी महत्त्वाची कामे आणि निर्णय घेणे टाळले पाहिजे. जेणे करून दुर्दैवाने यश न मिळाल्यास नुकसान होणार नाही. मात्र त्यांच्या राशीमध्ये जुने खास मित्र भेटण्याचा योग संभवतो.

follow us