Download App

Health Update : पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या…

Health in Rain : जून महिना सुरू झाला आहे. एव्हाना पावसाची सुरूवात देखील होत असते. मात्र 6 जून उजाडले, तरीही केरळमध्ये मान्सून दाखल झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान खात्याने 9 जून रोजी राज्यात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवला होता. देशात मान्सूनचा प्रवेश अद्याप जाहीर झाला नसल्याने येत्या चार दिवसांत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता कठीण आहे. मात्र, आठवड्याच्या अखेरीस कोकणात मान्सूनपूर्व पाऊस (Pre-monsoon rains) पडू शकतो. (How to take care in Rainy Season )

माजी आमदार Ramesh Kadam यांना 6 वर्षांनंतर जामीन, अर्थिक गैरव्यवहार प्रकरणी होते अटकेत

यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकांना ऋतू बदलल्यानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. त्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, अॅलर्जी यांसह अनेक समस्या निर्माण होत असतात. मात्र यावर आजार झाल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा हे आजार होऊच नये यासाठी अगोदरच काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे आपण पाहुयात की, पावसाळ्यात आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

Video : अभिनेता होण्यासाठी हरियाणातून आले मुंबईत; आता अंधेरीत विकतात ऑडी कारमधून चहा

बाहेरून आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवा, कारण आपण बाहेर ऑफिसमध्ये, शाळा-कॉलेजात, रस्त्यावर, बस-ट्रेन या ठिकाणी आपण जंतूंच्या संपर्कात येत असतो. काही खाण्याआधी साबणाने अथवा साबण नसल्यास सॅनिटायझरने हात धुवा.

पावसाळयात रस्त्यावरचे अन्न पदार्थ खाने टाळा. त्यावर धुळ बसते तसेच तेलकट पदार्थांमुळे घशाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. डासांपासून सुरक्षित रहा. डासांमुळे डेंगू मलेरिया सारखे आजार पसरतात.

पाणी उकळून प्या. जास्त प्रमाणात पाणी प्या पावसाळ्यात कमी तहान लागते. पण शरीराला साधारण 3 लिटर पाण्याची गरज असते. त्यामुळे आठवण ठेऊन, गरज पडल्यास दर एक तासाचा अलार्म लावून दिवसभरात 3 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. योग्य आहार घ्या. खूप तिखट पदार्थ खाणे टाळावे.

त्वचेची काळजी घ्या – पावसाळ्यात त्वचेचे इन्फेक्शन टाळण्यासाठी जेवणात कडू भाज्यांचा समावेश करा. पावसाळ्यात मिठाचे प्रमाण शक्य तेवढे कमी ठेवावे.

Tags

follow us