Video : अभिनेता होण्यासाठी हरियाणातून आले मुंबईत; आता अंधेरीत विकतात ऑडी कारमधून चहा

Video : अभिनेता होण्यासाठी हरियाणातून आले मुंबईत; आता अंधेरीत विकतात ऑडी कारमधून चहा

Tea stall in Audi car at Mumbai :  चहाप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच सध्या मार्केटमध्ये चहाचे विविध ब्रँड देखील तयार झाले आहेत. अमृततुल्य सारखे अनेक ब्रँड मार्केटमध्ये आहेत. चहाला या ब्रँडमुळे एक वेगळाच दर्जा मिळाला आहे. त्यामुळे सध्या सुशिक्षित तरुण देखील काहीतरी वेगळं म्हणून चहा विकण्याचा स्टार्टअप सुरू करताना दिसतात. आम्ही आज जी तुम्हाला स्टोरी सांगणार आहोत की देखील अशाच दोन मित्रांची आहे. ज्यांनी चहाच्या प्रेमासाठी आपल्या करोडो रुपयांच्या कारलाच टपरी बनवला आहे. खरं तर हे दोन मित्र चित्रपट सृष्टीत आपलं नशीब आजमावण्यासाठी आले पण आता ते चहा विकतात.

ही स्टोरी आहे हरियाणा राज्यातील दोन मित्रांची. अमित कश्यप आणि मनू शर्मा हे  दोन मित्र. अमित हा पंजाबचा असून मनू हरियाणाचा आहे.  या दोघांनाही अभिनेता व्हायचं आहे. चित्रपटावरील प्रेमासाठी या दोघांनी थेट मुंबई गाठली. लक्ष होतं मुंबईत यायचं चित्रपटात काम करायचं आणि अभिनेता व्हायचं. पण, मुंबई ही एक मायानगरी आहे. इथं अनेक जण आपले स्वप्न घेऊन येतात पण या सर्वांची स्वप्न पूर्ण होतातच असं नाही.

मनू हा हरियाणाचा असून अमित हा पंजाबचा आहे. हे दोघे जण सिनेमात काम करायचे म्हणून मुंबईत आले. पण चहाच्या शोधात व प्रेमापोटी त्यांनी चक्क ऑडी कारचा वापर करुन चहा विकायला सुरुवात केली. सोशल मीडियावर हा चहा मोठ्या प्रमाणात फेमस झाला आहे. यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. आम्ही दोघे मुंबईतील वर्सोवा येथे रहायचो. एक दिवस रात्री चहा पिण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. त्यावेळी आम्हाला कुठेही चहा मिळाला नाही. यानंतर माझा मित्र म्हणाला की, आपणच चहा विकायला सुरुवात करु.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण चहा तर विकायचा पण एकदम हटके स्टाईलने. माझ्याकडे ऑडी गाडी होती. मग आम्ही ऑडी मधूनच चहा विकण्याचे ठरवले, अशी प्रतिक्रिया या जोडीतील अमितने दिली आहे.तसेच जर तुमच्यासोबत चांगले लोक असतील तर तुमच्यासोबत सगळं चांगलच होईल, अशी प्रतिक्रिया मनूने दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube