माजी आमदार Ramesh Kadam यांना 6 वर्षांनंतर जामीन, अर्थिक गैरव्यवहार प्रकरणी होते अटकेत
Ramesh Kadam : सोलापूरमध्ये बोगस लाभार्थ्यांच्या नावाने कर्ज काढून आण्णाभाऊ साठे महामंडळात गैरव्यावरहार केल्या प्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना जिल्हा सत्र न्यायाधीश आर एन पांढरे यांनी जामीन मंजूर केला आहे. तब्बल सहावर्षांनी हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. ( Ex-MLA Ramesh Kadam Got Bail after six years )
Video : अभिनेता होण्यासाठी हरियाणातून आले मुंबईत; आता अंधेरीत विकतात ऑडी कारमधून चहा
कदम यांनी त्यांची आजी बायम्मा गणपत क्षीरसागर (रा. नांदणी ता. बार्शी) यांच्या नावे दुग्धव्यावसाय करण्यासाठी हे बेकायदेशीर कर्ज घेण्यात आलं होतं. त्याचबरोबर कर्ज मंजूरीसाठी आदेश काढणे आणि ते वितरित करण्यासाठी दबाव आणल्याचं देखील सांगण्यात येत होत. या प्रकरणात शासनाची व महामंडळाची सहा लाख 36 हजार 658 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
WFI Elections : कुस्ती महासंघाची निवडणूक कधी होणार? IAO प्रमुख पीटी उषा यांनी थेट सांगितलं
याबद्दल अनिल म्हस्के यांनी तक्रार केल्यानंतर 31 मे 2017 ला सोलापुरातील सदर बाजार पोलिसांनी ही तक्रार नोंदवत रमेश कदम यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांचे वकिल ऍड. मिलिंद थोबडे यांनी कदम यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला अखेर तब्बल सहावर्षांनी हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान कर्ज मंजुरीची रक्कम ही देखील लाभार्थी बायम्मा क्षिरसागर हिच्या खात्यामधून फ्रीझ केलेली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास आता पूर्णत्वात आला असल्याचा युक्तिवाद मांडला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर रमेश कदम यांना जामीन मंजूर केला.