WFI Elections : कुस्ती महासंघाची निवडणूक कधी होणार? IAO प्रमुख पीटी उषा यांनी थेट सांगितलं

WFI Elections : कुस्ती महासंघाची निवडणूक कधी होणार? IAO प्रमुख पीटी उषा यांनी थेट सांगितलं

Wrestling Federation Of India Elections : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावरील वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IAO)अध्यक्ष पीटी उषा यांनी डब्ल्यूएफआयच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे सांगितले आहे. हरियाणातील सोनपत येथे सुरु असलेल्या कनिष्ठ कुस्ती चाचण्यांच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज (दि.6) आलेल्या पीटी उषा आल्या होत्या. त्यांनी सांगितले की, भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय तदर्थ समिती निवडीसाठी जाईल. आणि ती लवकरच केली जाईल असंही यावेळी पीटी उषा यांनी सांगितलं आहे.

Mahrashtra Congress : अशोक चव्हाणांनी थेट दिल्ली गाठली ! नाना पटोलेंचे पद जाणार ?

13 मे रोजी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निर्देशानुसार, तदर्थ समितीने (तात्पुरती समिती) भारतीय कुस्ती महासंघ चालविण्यासाठी या संस्थेचे संपूर्ण प्रशासकीय आणि आर्थिक नियंत्रण घेतले होते.

27 एप्रिल रोजी तदर्थ समिती स्थापन करण्यात आली. वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंद्र सिंग बाजवा आणि रायफल प्रशिक्षक सुमा शिरूर हे तदर्थ समितीचे सदस्य आहेत. समितीतील तिसरे सदस्य उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बनवले जाणार आहेत, ज्यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. तिसर्‍या सदस्याची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पी.टी.उषा यांनी सांगितले.

यापूर्वी क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुका रद्द केल्या होत्या. यानंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या कुस्तीची आंतरराष्ट्रीय संघटना, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून भारतात कुस्ती कोण चालवत आहे याबाबत उत्तर मागितले होते.

यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने युनायटेड वर्ल्ड रेसलिंगला संपूर्ण परिस्थिती सांगितली आणि सांगितले की तीन सदस्यीय तदर्थ समिती स्थापन करण्यात आली असून भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका 45 दिवसांत होतील. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला भारतीय कुस्ती महासंघ चालविण्यास मान्यता दिली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube