Download App

महिलेच्या गजब ऑर्डरमुळं ब्लिंकिट, झेप्टो अन् स्विगीची पळापळ; शर्यतीत कुणी पटकावला नंबर

Hyderabad Woman Orders Via Blinkit Zepto And Swiggy : सध्या आपण कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) अॅपला प्राधान्य देतो. यामुळे आपला वेळ अन् मेहनत वाचते. आपल्यासमोर असंख्य अॅप्सचे पर्याय उपलब्ध आहेत, परंतु आपल्याला लवकरात लवकर सेवा पुरवणारं अॅप हवं असतं. यासाठी हैद्राबादमधील स्नेहा नावाच्या महिलेनं एक अनोखा प्रयोग (Delivery App) केलाय. तिने ब्लिंकिट (Blinkit), झेप्टो (Zepto) अन् स्विगी (Swiggy) या तिन्ही अॅपवर एकाच वेळी ऑर्डर केली, पाहा या शर्यतीत कोण जिंकलं?

स्नेहा हैद्राबाद कॅम्पसमध्ये शिकत असून इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB) ची विद्यार्थिनी आहे. तिने X वरील पोस्टच्या मालिकेत तिचे निष्कर्ष शेअर केलेत. तिने आणि तिचा मित्र आर्यनने डिलिव्हरी अॅपच्या वितरण वेळेची चाचणी घेण्यासाठी एकाच वेळी ॲप्सवरून वेगवेगळ्या वस्तू ऑर्डर केल्या होत्या. स्नेहाने यासंदर्भात X अकाउंटवर एक सोशल मीडिया पोस्ट केलीय. ती सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतेय.

महायुतीत मनसेची एन्ट्री शिंदेंच्या आडमुठ भूमिकेमुळे फिस्कटली; कार्यकर्त्यांचं ठाकरेंसमोर खळ्ळखट्याक

सर्वात आधी कोण डिलिव्हरी पोहोचवतं हे पाहण्यासाठी स्नेहाने तीन अॅपवर एकाच वेळी सामान ऑर्डर केलं होतं. तिने स्विगी इंस्टामारवरून सिड फार्मचं दूध मागवलं होतं, ज्याची डिलीव्हरी होण्यास 21 मिनिटांचा कालावधी लागणार होता. तर झेप्टो अॅपवरून मिल्की मिस्ट पनीर मागवलं होतं, जे 8 मिनिटांत पोहोचणार होतं. तर ब्लिंकिट अॅपवरून सुपर यु आणि व्होल ट्रुथ प्रोटीन बार मागवला होता, तो 13 मिनिटांत पोहोचणार होतं.

सर्वात आधी सामान कोण डिलिव्हर करतं? या शर्यतीत झेप्टोने ब्लिंकिटने बाजी मारली आहे. तर स्विगी दुसऱ्या क्रमांकावर आहे तर झेप्टो सर्वात शेवटी आहे. दहा मिनिटात डिलिव्हरी करण्याचं सांगून ब्लिंकीटने अर्धा तास उशिराने सामान पोहोचवले आहे. झेप्टो डिलिव्हरी पार्टनरशी केलेल्या चॅटमध्ये कळले की कॅम्पसपासून स्टोअरच्या अंतरामुळे उशीर झाला, असं स्नेहा म्हणते.

Video : दिल्ली विधानसभेच्या तारखांची घोषणा अन् निवडणूक प्रमुखांचा शायराना अंदाज

स्नेहाच्या या पोस्टवर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांचे देखील अनुभव शेअर केलेत. एक युझर म्हणाला की, माझ्या दिल्लीतील राहत्या ठिकाणापासून एक स्विगी स्टोअर 10 मीटर अंतरावर होते. वितरणास 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला पाहिजे, परंतु चुकीचे नकाशांमुळे ते 20 मिनिटे झाले. स्नेहाने व्हिडिओंसह तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय. तिचा प्रयोग ऑनलाइन हिट झाल्याचं देखील दिसतंय.

 

follow us