घाण पाणी साचलेले, बुरशी लागलेले अन्नपदार्थ; राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एफडीआयचा झेप्टोला दणका

  • Written By: Published:
घाण पाणी साचलेले, बुरशी लागलेले अन्नपदार्थ; राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एफडीआयचा झेप्टोला दणका

Maharashtra FDA suspends Zepto’s food licence in Dharavi over hygiene violations: मुंबईतील क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म झेप्टोची (Zepto’s) मूळ कंपनी किरणकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकत मोठी कारवाई केलीय. या कंपनीचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आलाय. मुंबईतील धारावीतील झेप्टोच्या एका स्टोअर रुमवर ही कारवाई करण्यात आली.

बिश्नोई गँगच्या सदस्याला यवतमाळ गुन्हे शाखेकडून अटक, कोण आहे हा?, कसा आला महाराष्ट्रात?

झेप्टोच्या धारावी येथील स्टोअर रुममध्ये अन्न पदार्थ खराब अवस्थेत ठेवलेले असल्याचे तक्रार मनसेकडून करण्यात आली होती. तसेच अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी एफडीआयचा कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबईतील एफडीआयचे सहआयुक्त मंगेश माने, अन्न सुरक्षा अधिकारी राम बोडके यांनी धारावीत छापा टाकला. त्यातेवेळी स्टोअर रुममध्ये काही अन्नपदार्थांवर बुरशी वाढल्याचे दिसून आले. घाण

बीड पुन्हा चर्चेत; वेश्या व्यवसायावर टाकला छापा, परराज्यातील महिलेची सुटका अन् तिघांना अटक

साचलेल्या पाण्याजवळ अन्न पदार्थ ठेवलेले होते. थेट जमिनीवर अन्न पदार्थ ठेवलेले होते. ती जागी आली होती फरशीची स्वच्छता करण्यात आलेली नव्हती. थेट जमिनीवर ठेवलेले अन्नपदार्थ खराब झालेले आढळून आले. त्यानंतर एफडीएने अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 आणि अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न व्यवसायांचे परवाना आणि नोंदणी) नियम 2011 चे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीचा अन्न परवाना रद्द केलाय. नमूद केले. सहाय्यक आयुक्त (अन्न) श्रीमती अनुपमा बाळासाहेब पाटील यांच्या स्वाक्षरी असलेल्या कायदा आणि नियमन २.१.८(४) च्या कलम ३२(३) अंतर्गत तात्काळ निलंबन आदेश जारी करण्यात आला.

आम्ही काही काळापासून या गोदामांची तपासणी करण्याचा विचार करत होतो. परंतु त्यापूर्वी आम्हाला दोन सूचना मिळाल्या. एक अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयातून आणि दुसरी स्थानिक मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून. या सूचनांच्या आधारे आम्ही आमची तपासणी केली. परिस्थिती इतकी वाईट होती की आम्हाला परवाना तात्काळ निलंबित करावा लागला असे, एफडीआयच्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे. यावर झेप्टोने खुलासा केला असून, आम्ही त्रुटी दुरू करून चांगले उत्पादने ग्राहकांना देऊ असे म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube