Hyundai Cars Discount Offers : भारतीय बाजारपेठेत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी ह्युंदाई ऑटो कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात जबरदस्त ऑफर जाहीर केली आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही आता अगदी कमी किंमतीमध्ये नवीन कार खरेदी करु शकतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या ऑफरचा फायदा घेत तुम्ही Grand i10 Nios, i20, Venue, Exter, Verna आणि Tucson सारख्या कार्स कमी किंमतीमध्ये खरेदी करु शकतात.
कंपनी या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 70,000 रुपयांपर्यंतची सूट देत आहे तसेच या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज/स्क्रॅपेज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश करण्यात आला आहे.
Hyundai Venue
या ऑफरचा फायदा घेत तुम्ही एप्रिल 2025 मध्ये Hyundai Venue स्वस्तात खरेदी करू शकतात. कंपनी या कारवर एप्रिलमध्ये 70,000 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. या कारच्या एन लाईन व्हेरियंटवर 35000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे तर या व्हेरियंटमध्ये यात 1.5-लिटर डिझेल इंजिन, 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.0 -लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन पर्याय देण्यात आला आहे.
Hyundai Grand i10 Nios
या ऑफरमध्ये तुम्हाला Hyundai Grand i10 Nios देखील खरेदी करण्याची संधी आहे. या ऑफरमध्ये या कारवर 68000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. भारतीय बाजारात ही कार 1.2 -लिटर पेट्रोल इंजिन आणि फॅक्टरी-फिटेड सीएनजी किटसह उपलब्ध आहे.
Hyundai i20
तर दुसरीकडे या ऑफर अंतर्गत तुम्हाला Hyundai i20 खरेदी करण्याची देखील संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीकडून या ऑफर अंतर्गत Hyundai i20 वर 65000 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. तर या कारच्या i20 एन लाईन ट्रिम्सवर 45000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. या कारमध्ये 1.2 -लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
Hyundai Tucson
तर कंपनी Hyundai Tucson वर देखील शानदार ऑफर देत आहे. या कारवर कंपनीकडून 50000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय बाजारात ही कार दोन इंजिन पर्यायांसह ऑफर करण्यात येते.
मोठी बातमी, 10 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा चलनात येणार, RBI ची घोषणा
Hyundai Verna
Hyundai Verna वर कंपनी 50,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनी ही सेडान कार दोन पेट्रोल इंजिनसह देते, जे 1.5 -लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.5 -लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहेत.