Download App

IDBI बँकेत नोकरीची उत्तम संधी! कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापकाच्या 600 रिक्त पदांसाठी भरती, ‘या’ तारखेपूर्वी अर्ज करा

  • Written By: Last Updated:

IDBI Bank Recruitment 2023 : गेल्या काही दिवसांत सरकारी क्षेत्राबरोबरच खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे. अशा परिस्थितीत बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळण्याच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत. बँकिंग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी आहेत. तुम्ही देखील बँकेत नोकरीच्या शोधात असाल, तर IDBI बँक तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी घेऊन आली आहे.  IDBI बँकेने कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी नवीन भरती प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत, कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (Junior Assistant Manager) पदासाठी 600 रिक्त जागा भरल्या जातील.

भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक.

एकूण रिक्त पदे– 600

पदांचा तपशील-
IDBI बँक कनिष्ठ सहायक व्यवस्थापक भरती 2023 मध्ये सर्वसाधारण श्रेणीसाठी 243 जागा आहेत.
तर, 60 पदांसाठी EWS,
ओबीसींसाठी 162 जागा,
अनुसूचित जातीसाठी 90 जागा,
तर 45 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.

राज्यात पावसाची स्थिती बिकट, पाणीटंचाईचा प्रश्न उद्गभवणार? पापाणीसाठ्याची धक्कादायक आकडेवारी समोर…
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 20 ते 25 वर्षे.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.

अर्ज फी –
खुला/ओबीसी प्रवर्ग – रु 1000.
मागासवर्गीय/पीडब्ल्यूडी – रु. 200.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत वेबसाइट – https://www.idbibank.in/

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2023

निवड प्रक्रिया:
ऑनलाइन चाचणी, वैयक्तिक मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीनंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/112jBkIXwXk87QuVSUqkt_fa7r5LiF28E/view

Tags

follow us