राज्यात पावसाची स्थिती बिकट, पाणीटंचाईचा प्रश्न उद्गभवणार? पापाणीसाठ्याची धक्कादायक आकडेवारी समोर…

  • Written By: Published:
राज्यात पावसाची स्थिती बिकट, पाणीटंचाईचा प्रश्न उद्गभवणार? पापाणीसाठ्याची धक्कादायक आकडेवारी समोर…

मुंबई : पावसाळा सुरू होऊन दोन-अडीच महिने झाले असले तरी अद्याप मुसळधार पाऊस (Heavy Rain) न झाल्याने अनेक जलसाठे अद्याप रिकामेच आहेत. राज्यातील बहुतांश भागात अपेक्षेप्रमाणे पाऊन न झाल्यान अनेक जिल्ह्यांत अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईचा (water shortage) प्रश्न उद्भवू शकतो. सध्या राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ९५ तालुक्यांतील धरणांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे.

राज्यात जुलै महिन्यापासून सलग मुसळधार पाऊस झालेला नाही.अधूनमधून पाऊस पडत असला तरी धरणांमधील पाणीसाठा वाढ होईल, एवढा पाऊस झाला नाही. ऑगस्ट आणि त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात पावसाने पाठ फिरवल्याचं चित्र आहे. त्यामुळं राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत बिकट असल्याचे निरीक्षण जलसंपदा विभागाने नोंदवलं.

राज्यात 358 तालुके आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, त्यापैकी 95 तालुक्यांमध्ये पाण्याचा साठा कमी आहे राज्यात सध्या ६८ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के कमी आहे. पुणे विभागात पुरंदर, बारामती, दौंड, शिवाय माण, खटाव तालुक्यात पाणीसाठा कमी आहे.

संसदेचं विशेष अधिवेशन आजपासून, कोणत्या मुद्दांवर होणार चर्चा? महिला आरक्षणसाठी विरोधी पक्ष आग्रही 

तर सोलापूर जिल्ह्यात सर्वात वाईट परिस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माळशिरस, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये पाण्याची स्थिती चिंताजनक आहे. नगर, सांगली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, बुलढाणा, जळगाव, जालना, धाराशिव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाणीसाठा कमी असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे. त्यामुळं राज्यात पाणीसाठा चिंतेचा विषय झाला आहे.

विभागनिहाय पाणीसाठ्याची स्थिती (टक्केवारीत)

विभागाचे नाव         १५ सप्टेंबरपर्यंत पाणीसाठा
नागपूर                                ८३.६८
अमरावती                           ७४.५०

छत्रपती संभाजीनगर           ३२.५१

नाशिक                              ६९.०५.
पुणे                                   ७३.०६
कोकण                              ९२.७०

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube