Download App

IIT Bombay मध्ये नोकरीची संधी, 42 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 2 लाखांहून अधिक पगार

  • Written By: Last Updated:

IIT Bombay Bharti 2023: तुम्ही पदवीधर असाल आणि चांगल्या नोकरीच्या (Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने (Indian Institute of Technology Bombay) ‘मुख्य अभियंता, मुख्य सुरक्षा अधिकारी, ग्रंथालय अधिकारी, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक’ पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रसिद्ध केली आहे.

मनमाड-येवला महामार्गावर कार आणि ट्रकची समोरासमोर धडक, पाच जण जागीच ठार 

या भरतीसाठी, पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरू शकतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई भरती 2023 साठी अर्जाची अंतिम तारीख, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – मुख्य अभियंता, मुख्य सुरक्षा अधिकारी, ग्रंथालय अधिकारी, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक

एकूण पदांची संख्या- 42

पदांचा तपशील-
मुख्य अभियंता – 01 पद
मुख्य सुरक्षा अधिकारी – 01 पद
ग्रंथालय अधिकारी – 02 पदे
कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक – 38 पदे

शैक्षणिक पात्रता –
मुख्य अभियंता – स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये BE/B.Tech उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मुख्य सुरक्षा अधिकारी – संबंधित विषयात पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा वीस वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
ग्रंथालय अधिकारी – लायब्ररी सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स, डॉक्युमेंटेशन सायन्स इत्यादी विषयातील पदव्युत्तर पदवी आणि संबंधित सहा वर्षांचा कामाचा अनुभव.
कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक – मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Rain Update: नगर, पुणे, नाशिकला अवकाळी, गारपीटीचा तडाखा; पिके भुईसपाट ! 

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाइट – https://www.iitb.ac.in/

वेतन-
मुख्य अभियंता – 1 लाख 44 हजार 200 ते 2 लाख 18 हजार 200
मुख्य सुरक्षा अधिकारी – 78 हजार 800 ते 2 लाख 9 हजार 200
ग्रंथालय अधिकारी- 56 हजार 100 ते 1 लाख 77 हजार 500
कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक- 21 हजार 700 ते 69 हजार 100

असा अर्ज करा-
उमेदवार भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा.
अपूर्ण माहितीने भरलेला अर्ज नाकारला जाईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.

जाहिरात
https://drive.google.com/file/d/1XA5x7DXLSBEwawSuPx8r5u0X6Qp3jsBJ/view

Tags

follow us