मनमाड-येवला महामार्गावर कार आणि ट्रकची समोरासमोर धडक, पाच जण जागीच ठार
Manmad Yeola Accident : राज्यभरात सातत्याने होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहे. अशातच आता नाशिक जिल्ह्यातील मनमाड-येवला (Manmad Yeola Highway) राज्य महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार आणि ट्रकची धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेस शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.
Rain Update: नगर, पुणे, नाशिकला अवकाळी, गारपीटीचा तडाखा; पिके भुईसपाट !
याबाबत अधिक माहिती अशी की, धार्मिक कार्यक्रमाला जात असल्याचे सांगून हे तरूण बाहेर पडले होते. येवला मार्गे मनमाडजवळील म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रमातून परतत असताना अनकवाडेजवळ ट्रक व तरुणांच्या कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. ट्रकखाली कार दबली गेल्यानं पाचही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतिक नाईक अशी मृतांची नावे आहेत. हे सगळे नाशिकमधील रहिवाशी असल्यचाी माहिती आहे.
भाजप 26 तर अजितदादा गटाला 22 जागा, फडणवीसांच्या जागावाटपावर अजित पवारांचं ‘नो कमेंट’
या अपघाताची माहिती परिसरातील लोकांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य केले. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. ही धडक इतकी भीषण होती की, स्विफ्ट कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. घटनास्थळी मदतीला पोहोचलेल्या ग्रामस्थांना कारमधून मृतदेह बाहेर काढतांना बराचा त्रास झाला. सायंकाळची वेळ असल्यानं अंधार आणि पावसामुळं मदतकार्य राबवण्या अडथळा येत होता. सर्व मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
या भीषण अपघातामुळं सुमारे तासभर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही गाड्या क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला नेण्यात आल्या.
या अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली. मृत तरुणांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संपर्क साधला. त्यांना दिलासा दिला देऊन सर्वोतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन दिले. मालेगाव मनमाड रस्त्यावर अपघात होऊन वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या.