BHEL मध्ये दहावी पास आणि इजिनिअर्संना नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू
BHEL Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली. ती म्हणजे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत अप्रेंटीस पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत सुमारे 680 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवार हे ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा याबद्दल तपशीलवार माहिती ही नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.
पदाचे नाव – अप्रेंटीस
शाखा – पदवीधर, टेक्निशियन, ट्रेड
पदांचा तपशील
ट्रेड अप्रेंटिस – 398
टेकेनिशनय अप्रेंटीस – 103
ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 179
एकूण रिक्त पदे- 680
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर : 70% गुणांसह B.Com/B.A/ संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी
तंत्रज्ञ: 70% संबंधित विषयातील अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा
ट्रेड : संबंधित विषयात ITI. दहावी पास
अधिकृत वेबसाईट – http://bhel.com/
Imad Wasim : पाकिस्तानला धक्का! वर्ल्डकपनंतर ‘या’ अष्टपैलू खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती
वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 18 ते 27 वर्षे.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षे सूट.
अर्ज शुल्क –
खुला/EWS/OBC/मागासवर्गीय/PWD/माजी सैनिक – कोणतेही शुल्क नाही.
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात – 25 नोव्हेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2023
अर्ज प्रक्रिया:
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइनच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल. त्यासाठी BHEL च्या अधिकृत वेबसाइटला bhel.com वर भेट द्या. मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या भरती लिंकवर क्लिक करा.
लिंकवर क्लिक केल्यावर एक नवीन पेज उघडेल. त्यानंतर तेथील रिक्त जांगाच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर स्वतःची नोंदणी करा. नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुमच्या खात्यात लॉग इन करा. अर्ज भरा आणि अर्ज फी भरा. अर्ज अंतिम तारखेपूर्वी म्हणजेच 01 डिसेंबर 2023 पूर्वी सबमिट करणे आवश्यक आहे. उशीरा आणि चुका असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.