Prajakta Mali: ‘महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयुष्यात आदित्य मिळो’; प्राजक्ताच्या मनात काय?

Prajakta Mali: ‘महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयुष्यात आदित्य मिळो’; प्राजक्ताच्या मनात काय?

Prajakta Mali Post: मराठी मनोरंजनविश्वातील सर्वात जास्त लोकप्रिय जोडी म्हणजे ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि प्राजक्ता माळीची (Prajakta Mali). ललित प्रभाकर- प्राजक्ता माळी ‘जुळून येती रेशीमगाठी’ (Julun Yeti Reshimgathi Serial) या मराठी सिरियलमधून चाहत्यांच्या भेटीला आले होते. या सिरियलने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली, असे म्हणायला हरकत नाही. चाहत्यांनी या सीरियलमधील आदित्य-मेघनाच्या जोडीला डोक्यावर घेतले होते. या सिरीयला आज 10 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने प्राजक्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)


‘जुळून येती रेशीमगाठी’ सिरीयला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. चाहते अजून देखील मेघना- आदित्यच्या जोडीला भरभरून प्रेम दिलं आहे. सिरियलमधील कलाकारांची टीम पुन्हा एकदा एकत्र आल्याचे बघायला मिळाले आहे. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. त्यामुळे सिरियलची दुसरा भाग येणार का? अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे.

ललित प्रभाकरने सोशल मीडियावर प्राजक्ता माळीसोबतचे एक हटके अंदाजातला फोटो पोस्ट केले आहे. ‘काढायचा का दुसरा भाग? जुळून येती रेशीमगाठी (नाम तो सुना होगा)’ असं कॅप्शन दिले आहे. ललितच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल्याचे दिसत आहे. अनेकांनी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसावी अशी इच्छा व्यक्त करत आहे.

Salman Khan : ‘Tiger 3’नंतर आता भाईजानचा ‘द बुल’ येणार चाहत्यांच्या भेटीला

एका युट्यूब चॅनलला ‘जुळून येती रेशीमगाठी’ सिरियलच्या संपूर्ण टीमने मुलाखत दिली आहे. त्यानिमित्त ललितने प्राजक्तासोबत फोटोशूट केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सिरियलचा दुसरा भाग येणार का? याची उत्सुकता मात्र चाहत्यांना लागली आहे. झी मराठीवर 2013 साली जुळून येती रेशीमगाठी सिरीयल सुरू झाली होती. ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळाले. चाहत्यांनी या जोडीला खूप चांगला प्रतिसाद दिला होता. आदित्य- मेघनाची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube