जबरदस्त! ‘मनसेच्या नव्या’ गाण्यावर प्राजक्ता माळी दिलसे नाचली; Viral Video एकदा पाहाच…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 03T120032.811

Prajakta Mali Viral Dance Video : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या दरम्यान मनसेचा नवीन गाणं प्रसिद्ध करण्यात आला. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तने (Avadhut Gupte) हे गाणं गायलं आहे. या गाण्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. नुकतंच मनसेच्या या नव्या गाण्यावर प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) भन्नाट डान्स (Viral Dance Video) केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Thackeray (@rajthackerayfanclub)


मनसेचे नवीन पक्षगीत हे ५ मिनिटांचे आहे. “प्रश्न जिथे मनसेचा, मार्ग तिथे मनसेचा, नवनिर्माण घडवूया, मनसे…” असे या नवीन गाण्याचे बोल आहेत. नुकतंच ‘राज ठाकरे फॅन क्लब’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्राजक्ता माळीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता माळी ही मनसेच्या या नव्या गाण्यावर भन्नाट डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

दरम्यान या व्हिडीओवर तिच्या अनेक प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत. “महाराष्ट्राची मराठमोळी शेरणी….”, अशी कमेंट एका व्यक्तीने या व्हिडीओवर केली आहे. तर दुसऱ्याने “नुसत गाण्यावर नाचून चालणार नाय , सरकार मनसे च आल पाहिजे असं काहीतरी करा”, अशी कॉमेंट्स सध्या तिला मिळत आहेत, “ह्याला बोलतात प्राजक्तराजची भरारी, गर्व आहे आम्हाला आमच्या आपल्या अस्सल मराठी कलाकारांचा आपल्या प्राजूचा”, अशी जोरदार कॉमेंट्सचा पाऊस सध्या तिच्या या भन्नाट गाण्यावर मिळत आहेत.

गिगी हदीदला ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर ट्रोल करणाऱ्यांना वरुणचे सडेतोड उत्तर, म्हणाला…

यावेळी प्राजक्ता ही छान मराठमोळ्या पद्धतीने या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओत प्राजक्ता ही गाण्याच्या लिरिक्सप्रमाणे डान्स करत असताना दिसून आली आहे. विशेष म्हणजे प्राजक्ताला हे गाणं तोंडपाठ असल्याचे देखील दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Tags

follow us