गिगी हदीदला ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर ट्रोल करणाऱ्यांना वरुणचे सडेतोड उत्तर, म्हणाला…
Varun Dhawan Viral Video : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) या व्हिडीओमुळे खूपच चर्चेत येत आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या सोहळ्यादरम्यान वरुण धवनने अमेरिकन अभिनेत्री गिगी हदीदला उचलून घेतलं आणि तिच्या गालावर किस केलं. (Varun Dhawan Viral Video) हॉलिवूड अभिनेत्रीला किस करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
यामुळे सध्या तो ट्रोल होत आहे. या व्हायरल व्हिडीओवर वरुण धवनने आता स्पष्टीकरण दिलं आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या सोहळ्याच्या दरम्यान राजकीय नेते मंडळी तसेच बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडच्या कलाकारांनी मोठी हजेरी लावली होती. अमेरिकन अभिनेत्री गिगी हदीदही (Gigi Hadid) या कार्यक्रमाला आपली उपस्थित लावली होती.
या सोहळ्याच्या दरम्यान वरुण धवनने एक डान्स सादर केला. डान्स परफॉर्मन्सच्या दरम्यान वरुनने गिगिला हाताला धरुन स्टेजवर आणलं. आणि ती मंचावर येताच त्याने तिला उचलून घेतलं आणि तिच्या गालावर किस केले आहे. वरुन धवनचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या नेटकरी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. गिगिची परवानगी न घेता तिला किस करणं चाहत्यांना चांगलेच खटकल्याने वरुनला ट्रोल करत आहे.
I guess today you woke up and decided to be woke. So lemme burst ur bubble and tell u it was planned for her to be on stage so find a new Twitter cause to vent about rather then going out and doing something about things . Good morning 🙏 https://t.co/9O7Hg43y0S
— VarunDhawan (@Varun_dvn) April 2, 2023
वरुनच्या व्हिडीओवर ‘हे सगळं करण्याअगोदरच गिगीची परवानगी घेतली होतीस का?’, ‘तू सेलिब्रिटी असलास तरी गिगी तेथे पाहुणी म्हणून आली होती’,’गिगीची परवानगी तू घ्यायला हवी होतीस, ‘या कारणाने भारतात कोणी सेलिब्रिटी येत नाहीत’ अशा कमेंट्स करत चाहत्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे.
Parineeti Chopra : ‘राजकारणी नवरा…’ खासदार राघव चड्ढा यांच्याशी लग्नाच्या चर्चांदरम्यान परिणीतीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
यावरून वरुन धवनने स्पष्टीकरण दिलं
गिगिला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानवर वरुन धवनने ट्वीट करत त्याची बाजू मांडली आहे. त्याने ट्वीट केलं आहे, गिगिला मी स्टेजवर घेऊन येणार आणि किस करणार हे अगोदरच ठरलं होतं. यामुळे कारण माहिती नसताना यावर प्रतिक्रिया देऊ नका.