Download App

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, पोस्ट खात्यात ‘या’ पदांसाठी भरती सुरू

  • Written By: Last Updated:

India Post Recruitment 2024 : आजचे युग हे प्रचंड स्पर्धेचे युग असून या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी (Govt job) मिळवणे हे तरुणांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, तुम्ही जर 10 वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय टपाल विभागात अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय टपाल विभाग (Indian Department of Posts) आणि दळणवळण मंत्रालयाने ड्रायव्हर ( सामान्य श्रेणी) पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट http://www.indiapost.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमध्ये ब्रेक, सरकारने दिले ‘हे’ कारण 

अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख ४२ दिवस म्हणजे एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १६ फेब्रुवारीपर्यंत आहे.

भारतीय टपाल विभागाच्या या भरती मोहिमेद्वारे एकूण 78 पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती भारतीय टपाल विभाग, दळणवळण मंत्रालयाने जाहीर केली आहे. या पदांसाठी फक्त ऑफलाइन अर्ज करता येतील. इच्छुक उमेदवार तपशील जाणून घेण्यासाठी indiapost.gov.in. या वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Vibrant Gujarat Summit : ‘जे बोलतो ते पूर्ण होतं’; PM नरेंद्र मोदींनी दिली जनतेला गरंटी 

मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय त्यांच्याकडे जड वाहन चालवण्याचा वैध परवानाही असावा. तीन वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभवही आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया-

उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षा अभ्यासक्रम इत्यादींची माहिती अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या नोटीसमध्ये दिली आहे. या पदभरतीचा अर्ज करण्यासाठी १०० रुपये शुक्ल भरावे लागेल.

अधिसूचना- https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/06012024_UPdriver_English.pdf

पगार:

निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन 19,900 ते 63,200 रुपये असू शकते.

अर्ज कसा करावा-
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे, त्यापूर्वी अर्ज करा. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे. व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, कानपूर, जीपीओ कंपाउंड, कानपूर, 208001. उत्तर प्रदेश. या पत्यांवर अर्ज पाठवा.

उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे. अर्ज करतांना अर्जात कोणत्याही चुका राहिल्यास किंवा अर्ज अर्धवट भरल्यास अर्ज नाकारला जाईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

follow us